बेळगाव : बेळगाव-बेंगळूर वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातील सहा दिवस धावणार आहे. बुधवार वगळता इतर सर्व दिवस वंदे भारत धावणार असल्याने बेळगावच्या प्रवाशांची सोय होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून वंदे भारतचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. मंगळवारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वंदे भारत सुरू होत असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले होते. रविवार दि. 10 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन होणार आहे. यासाठी बेंगळूर येथे जय्यत तयारी केली जात आहे. बेळगावमध्येही मोठ्या उत्साहात वंदे भारतचे स्वागत केले जाणार आहे.
वेळापत्रक…
पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी बेळगावमधून वंदे भारत निघणार असून धारवाड, हुबळी, हावेरी, दावणगेरे, तुमकुर, यशवंतपूर असे थांबे घेत दुपारी 1.50 वाजता बेंगळूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी वंदे भारत बेंगळूरमधून निघणार आहे. रात्री 10.40 वाजता बेळगावला पोहोचेल. बुधवार वगळता इतर सर्व दिवस वंदे भारत धावणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.









