वार्ताहर/कुडाळ
एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचालित माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याचीवाडी विद्यालयाला कुडाळ येथील समर्थ ऍग्रो टेक चे मालक शैलेश प्रभू-पोतकर (रा. तेंडोली) यांनी पॉवर टिलर भेट दिला.माड्याचीवाडी विद्यालयात आयबीटी अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यात शेती हा प्रमुख विभाग आहे. यामध्ये वाल, दोडके, पडवळ, भेंडी, भोपळा, हळद, सुरण, आले लाल भाजी, मुळा तसेच भात शेती, भुईमूग लागवड, नाचणी लागवड अशी विविध उत्पादने घेतली जातात. सर्व उपक्रम शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने सुरु आहेत. विद्यालयात सुरु असलेल्या या उपक्रमाला आपली मदत व्हावी यासाठी शैलेश प्रभू यांनी विद्यालयाला पॉवर टिलर भेट दिला. यावेळी माड्याचीवाडी हॉटेल व्यवसायिक संतोष परब वराधाकृष्ण परब उपस्थित होते. संस्था चेअरमन देवदत्त साळगावकर, सचिव विजय ठाकूर व मुख्याध्यापक अनंत सामंत यांनी शैलेश प्रभू यांचे आभार मानले.









