वार्ताहर/उचगाव
तुरमुरी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष नागेश बेळगावकर होते. मुख्याध्यापक पन्हाळकर यांनी युवा समितीच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाला अॅड. अश्वजीत चौधरी, महेंद्र जाधव, निखिल देसाई, नितीन जाधव, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून शाळा, पालक आणि गावचे नाव उज्ज्वल करावे तसेच कोणत्याही वाईट व्यसनाच्या मागे न लागता अभ्यासावर भर द्यावा, असे मार्गदर्शन महेंद्र जाधव यांनी केले. सूत्रसंचालन मिलके यांनी केले. मंगनाकर यांनी आभार मानले.









