मारक पल्ला 75 किलोमीटरपर्यंत दुप्पट :
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय सैन्य स्वत:चे सामर्थ्य आणि शस्त्रास्त्रंना सातत्याने मजबूत करत आहे. याचा उद्देश ‘आत्मनिर्भर भारत’ पुढाकाराच्या अंतर्गत स्वत:चे फायरपॉवर वाढविणे आहे. पूर्वी सेन्य रशियाच्या मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर सारख्या ग्रॅड आणि स्मर्चवर निर्भर होते, परंतु आता स्वदेशी पिनाकाने सैन्याच्या शक्तीला अनेक पटीने वाढविले आहे. आता याचे नवे आणि अधिक शक्तिशाली वर्जन तयार आहे. एक्सटेंडेड-रेंज पिनाकाचे परीक्षण यशस्वीपणे पूर्ण झाले असून लवकरच ते सैन्यात सामील होणार आहे.
पूर्वी पिनाका रॉकेटचा मारक पल्ला 37 किलोमीटर होता, परंतु आता यच्या एक्सटेंडेड-रेंज वर्जनचा मारक पल्ला 75 किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. नवा पिनाका केवळ मारक पल्ल्यात नव्हे तर अचूकता आणि शक्तीतही अधिक प्रभावी आहे. ही प्रणाली आता जीपीएस नेव्हिगेशनने युक्त असून यामुळे एकदा लक्ष्य निश्चित झाल्यावर ही अत्यंत अचूक निशाणा साधते. ही प्रणाली लक्ष्यापासून 25 मीटरच्या कक्षेत मारा करू शकते, यामुळे ही प्रणाली अत्यंत घातक ठरते.
या रॉकेटमध्ये डागण्यापूर्वी टॅजेक्टी आणि टार्गेट प्रोग्राम केले जातात, जर कुठल्याही कारणाने हे भटकले तर ऑनबोर्ड कॉम्प्युटर आणि जीपीएस मिळून याला योग्य मार्गावर आणतात. याचबरोबर यात इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टीम (आयएनएस) देखील आहे, जी जीपीएस जाम झाल्यास किंवा बंद पडल्यावरही रॉकेटला लक्ष्यापर्यंत पोहोचविते.
एका बॅटरीचे सामर्थ्य : 44 सेकंदात विध्वंस
एका पिनाका बॅटरीत 6 लाँचर असतात, प्रत्येक लाँचरमध्ये 12 ट्यूब्स म्हणजेच एकूण 72 रॉकेट्स, हे सर्व 44 सेकंदांमध्ये डागले जाऊ शकतात. जर एकाचवेळी हे रॉकेट्स डागण्यात आले तर शत्रूच्या 1000 गुणिले 800 मीटरच्या भागात विध्वंस घडवून आणू शकतात. नवा गायडेड पिनाका सामील झाल्यास याची विध्वंसक शक्ती आणखी वाढणार आहे. डागण्यात आल्यावर लाँचर स्वत:ची जागा बदलतो आणि पुन्हा सज्ज होतो, यामुळे शत्रूला प्रत्युत्तरादाखल हल्ला करणे अवघड ठरते.
अलिकडेच पिनाकासाठी एरिया डिनायल म्युनिशन (एडीएम) टाइप-1 आणि हाय एक्सप्लोसिव्ह प्री-फ्रँगमेंटेड (एचईपीएफ) एमके-1 (एनहान्स्ड) रॉकेट्स खरेदी करण्यात आले आहेत. हे रॉकेट शत्रूच्या कारवायांना रोखणे आणि मोठ्या भूभागाला लक्ष्य करण्यास मदत करतील.
चीन अन् पाकिस्तानचे आव्हान
भारताने स्वत:च्या क्षमतांना चीन आणि पाकिस्तानचे आव्हान पाहता मजबूत केले आहे. सध्या सैन्याकडे 4 पिनाका रेजिमेंट्स आहेत, ही संख्या 10 पर्यंत वाढविण्याचे लक्ष्य आहे. याकरता नव्या रेजिमेंट्स तयार करण्याऐवजी वर्तमान 120 मिमी मोर्टार लाइट रेजिमेंट्सला पिनाकामध्ये बदलण्यात येत आहे. मागील वर्षी 2 लाइट रेजिमेंट्स बदलण्यात आल्या, यंदा आणखी 2 बदलण्यात येणार आहेत. पुढील 2 वर्षांमध्ये सैन्याकडे एकूण 10 पिनाका रेजिमेंट्स असतील. सैन्याची योजना 25 पिनाका मल्टी-बॅरल लाँचर सामील करण्याची आहे. याचबरोबर प्रशिक्षण आणि तैनाती देखील वेगाने होत आहे, जेणेकरून सीमेवरील मजबूत स्थिती कायम राहील.
आत्मनिर्भर भारताचे उदाहरण
पिनाकाचे यश ‘आत्मनिर्भर भारता’चे आकर्षक उदाहरण आहे. पूर्वी अशाप्रकारच्या प्रणालीसाठी भारत रशियावर निर्भर होता, परंतु आता डीआरडीओ आणि भारतीय कंपन्यांनी मिळून याला किवसित केले आहे. खासगी क्षेत्राच्या कंपन्या म्हणजेच सोलर इंडस्ट्रीज आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स यात मोठी भूमिका बजावत आहे. हे केवळ सैन्याचे सामर्थ्य वाढविणारे नसून भारताला शस्त्रास्त्रांच्या निर्यातीत मोठी मजल मारण्यास मदत करणार आहे.









