तीव्र उष्णतेच्या मारापासून वाचण्यासाठी माणूस अनेक उपाययोजना करू शकतो. परंतु प्रत्येकासाठी सर्व उपाय राबविणे शक्य नाही. ऑस्ट्रेलियातील कोबर पेडी एक अनोखे शहर असून येथे 55 अंश तापमानापासून वाचण्यासाठी लोक जमिनीखाली राहतात. मूळची जर्मनीची असलेली सबरीना ट्रोइसी आता कोबर पेडीत राहते, तिच्या परिवारात पती निक, 14 वर्षीय मुलगा थॉमस, 14 आणि 13 वर्षीय मुली आहेत. त्यांचे घर 1 लाख 77 हजार डॉलर्सचे म्हणजेच 2 कोटी 37 लाख रुपयांचे आहे. हे घर एका पर्वतात तयार करण्यात आले असून पर्वतीय पृष्ठभागाच्या 4 मीटर खाली आहे. यात दोन लिव्हिंग रुम्स, दोन बाथरुम आणि एक पूल आहे. घरात इनडोअर आणि आउटडोअर स्पा आहे. सबरीनाचे ऑफिस आणखी खाली आहे. सबरीना ऑफिस मॅनेजर असून ती उमूना ओपल माइन आणि म्युझियममध्ये काम करते.
कोबर पेडीत 1600 लोक राहतात. 60 टक्के लोक जमिनीखाली राहतात, जमिनीखालील घराला डगआउट म्हटले जाते. हे सँडस्टोनने तयार करण्यात आले आहेत. सबरीना जर्मनीत चाइल्डकेयर एज्युकेटर होती. ऑस्ट्रेलियात गॅप ईयर दरम्यान ती निकला भेटली, निक तिचा टूर गाइड होता, दोघेही प्रेमात पडले. 2013 मध्ये ते कोबर पेडी येथे स्थायिक झाले.
स्वस्त अन् शांत
जमिनीखाली राहणे स्वस्त आहे. अॅडलेडमध्ये घराची किंमत 4 कोटी 46 लाख रुपये आहे. येथे कमी खर्च आहे. हीटिंग आणि कुलिंगची गरज नाही. घर तयार करताना वेळ लागतो. काही घरं दोन महिन्यात तयार होतात. मी लोकांना 10 वर्षांपर्यंत खोदताना पाहिले आहे. जमिनीखाली राहण्याचा फायदा शांतता आहे. रात्री पूर्णपणे काळोख आणि शांतता अनुभवता येत असल्याने चांगली झोप लागते असे सबरीना सांगते.
मोठे शहर अन् कोबर पेडी
सुटीत अॅडलेड येथील गर्दीमुळे थकायला होते. परंतु कोबर पेडीत धूळ आणि देखभालीची समस्या आहे. भिंतींना सील न केल्यास धूळ येते, असे ती सांगते. सबरीनाची मुले जमिनीवरील आयुष्य विसरुन गेले आहेत. हॉटेलमध्ये राहिलो तर गोंगाट ऐकू येतो. कोबर पेडी दूर आहे. नजीकचे शहर 400 मैल अंतरावर आहे. परंतु येथील लोक परस्परांना मदत करतात. येथे सर्व काही 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. शहरातील धकाधकीचे जीवन पसंत नसल्याचे सबरीना सांगते.









