आम आदमी पार्टीचे महापौर मंगेश पवार यांना निवेदन
बेळगाव : शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तसेच अनेक रस्ते धोकादायक बनले असून, तातडीने सदर रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन आम आदमी पार्टीच्यावतीने सोमवार दि. 4 रोजी महापौर मंगेश पवार यांना देण्यात आले. महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध रस्त्यांवर धोकादायक खड्डे पडले आहेत. तसेच काही ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी सोयीस्कर राहिले नाही. त्यामुळे वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. तरी महापालिकेने तातडीने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आम आदमी पार्टीचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष विजय एल. पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.









