बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल आता हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. ‘कमांडो’ फेम अभिनेता आता कथित स्वरुपात लेजेंड्री एंटरटेन्मेंटचा आगामी लाइव्ह-अॅक्शन चित्रपट ‘स्ट्रीट फायटर’मध्ये धालसिमची भूमिका साकारणार असून ही एका फेमस व्हिडिओ गेम फ्रँचाइजीवर आधारित आहे.
विद्युतला मार्शल आर्ट्सचा छंद आहे, त्याने अनेक चित्रपटांमध्ये याचे प्रदर्शनही केले आहे. आता हॉलिवूडपटातही तो स्वत:च्या कौशल्याला दाखवून देऊ शकतो. धालसिमची भूमिका असलेला त्याचा चित्रपट रहस्यमय धाटणीचा आहे. या भूमिकेला सर्वप्रथम 1991 मध्ये ‘स्ट्रीट फायटर 2’मध्ये दाखविण्यात आले हेते. ही व्यक्तिरेखा केवळ स्वत:च्या परिवाराचे रक्षण करण्यासाठी त्याचे समर्थन करण्यासाठी जगाशी लढत असते. विद्युतच्या या चित्रपटात एंड्य्रू कोजी, नोआ सेंटीनो,
कॅलिना लियांग, डेव्हिड दास्तमालतियन, कोडी रोड्स, जेसन मोमोआ, कर्टिस
जॅक्सन, ओरविल पेर, एंड्य्रू शुल्ज, रोमन रेन्स आणि हुरकी गोटो वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसून येतील. या हॉलिवूड चित्रपटाची कहाणी स्ट्रीट फायटर ग्लोबल मार्शल आर्ट्स टूर्नामेंटच्या अवतीभवती घुटमळणारी आहे. यात जगभरातील योद्धे परस्परांच्या विरोधात लढताना दिसणार असल्याने मोठी उत्सुकता आहे.









