कडाडी यांची नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगावच्या सांबरा विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा द्यावा, तसेच येथील सुविधांमध्ये वाढ करावी. विमानतळाला कित्तूर राणी चन्नम्मा यांचे नाव द्यावे, तसेच विमानतळाच्या समोर त्यांचा भव्य पुतळा उभारा, अशी मागणी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मंगळवारी कडाडी यांनी दिल्ली येथे नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी विमानतळासंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बेळगाव विमानतळासंदर्भातील सर्व विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.









