वृत्तसंस्था / लंडन
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील लंडनच्या ओव्हल मैदानावर गुरुवार 31 जुलैपासून खेळविल्या जाणाऱ्या शेवटच्या सामन्यासाठी इंग्लंड संघामध्ये अष्टपैलु जेमी ओव्हरटनचा समावेश करण्यात आला आहे.
इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत सरे संघाकडून खेळणाऱ्या 31 वर्षीय अष्टपैलु ओव्हरटनने गेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून 3 सामने खेळले होते. तसेच 2022 साली लीड्स येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ओव्हरटनने फलंदाजीत 97 धावा तर गोलंदाजीत 2 गडी बाद केले होते. शेवटच्या कसोटीसाठी इंग्लंड संघामध्ये उर्वरित खेळाडू कायम ठेवण्यात आले असून केवळ ओव्हरटनचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
इंग्लंड संघ: स्टोक्स (कर्णधार), आर्चर, अॅटकिनसन, बेथेल, ब्रुक, कार्स, क्रॉले, डॉसन, डकेट, ओव्हरटन, पॉप, रुट, स्मिथ, टंग आणि वोक्स









