रत्नागिरी :
शासनाकडून किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांचा विकास करण्यासाठी येथील बंदरांचा विकास करावा लागेल़ त्यादृष्टीने शासनाकडून पावले उचलली जात आहेत़ मिरकरवाडा हे रत्नागिरी जिह्यातील महत्वाचे बंदर आह़े या बंदराच्या विकासामुळे स्थानिक मच्छीमारांच्या जीवनात समृद्धी येईल़ अतिक्रमण हटविण्याबाबत विरोधकांकडून गैरसमज पसरविण्यात आल़ा मात्र मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी अतिक्रमण हटविण्याचा कटु निर्णय आपल्याला घ्यावा लागला असे प्रतिपादन मत्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी केल़े
शहरातील मिरकरवाडा बंदर विकासाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन रविवारी मंत्री नीतेश राणे व पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडल़े यावेळी मत्स्य विकास आयुक्त किशोर तावडे, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, माजी जि.प. सदस्य बाबू म्हाप आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले की, मिरकरवाडा बंदर येथील अतिक्रमण हटविताना आमच्या पोटावर हे लाथ मारत आहेत का? विशिष्ट लोकांना लक्ष्य केले जात आहे का? असे प्रश्न विचारले जात होत़े मात्र मच्छीमार बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आम्ही अतिक्रमणासारख्या कठोर निर्णयांचीही भीती बाळगली नाही. आता या बंदराच्या आणि पर्यायाने इथल्या मच्छिमारांच्या विकासासाठी चांगल्या दर्जाची कामे केली जातील असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
- भारत माता की जय म्हणणाऱ्यांच्याच सोबत
हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्याचे काम राज्यातील हिंदुत्ववादी सरकार करत आह़े ‘जो देशावर प्रेम करतो, तिरंग्याला आपले मानतो, भारत माता की जय म्हणतो’ त्याच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करत़ो आम्ही कायम त्यांच्याच सोबत राहू मात्र जो ‘तन सर से जुदा कऊ’ म्हणतो त्याला आम्ही सोडत नाह़ी असे राणे यांनी ठणकावल़े
- अतिक्रमण हटविण्यासाठी पालकमंत्र्यांचे मोलाचे सहकार्य
सरकारच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे भविष्य घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत़ मिरकरवाडा बंदराच्या विकासासाठी निधी उपलब्ध कऊन देण्यात येईल़ मंत्री उदय सामंत हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले याबद्दल राणे यांनी आभार व्यक्त केल़े इथले अतिक्रमण हटवताना पालकमंत्री सामंत यांनी केलेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केल़ा अतिक्रमण हटविताना सामंत यांनी कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले होते असेही राणे यांनी सांगितल़े
- तिसऱ्या टप्प्याच्या विकासासाठी सज्ज
दुसऱ्या टप्प्यात विविध विकासकामांचा समावेश असून, बंदराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी साठवण क्षमता, बर्फ कारखाने, सांडपाणी व्यवस्था, प्रसाधनगृह, मासेमारीची यंत्रणा आणि इतर सोयी सुविधा यांचा समावेश आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यातील विकासासाठी आपण सज्ज राहणार आहोत असे मंत्री राणे यावेळी म्हणाले.
- बंदरासाठी आणखी 36 कोटींचा प्रस्ताव तयार – पालकमंत्री
मिरकरवाडा बंदर विकासासाठी आणखी 36 कोटींचा प्रस्ताव तयार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. मिरकरवाड्याचा विकास व्हावा, यासाठी गेली वीस वर्षे झगडतोय. पण, तो होण्यासाठी कोकणच्या सुपुत्रालाच मंत्री व्हावं लागलं. या बंदराच्या विकासासाठी 22 कोटींचा पहिला टप्पा सुरू झाला असून, 36 कोटींचा आराखडा विभागाने तयार केला आहे. यातूनच इथल्या मच्छीमारांना समृद्धीची नवी दिशा मिळणार आहे.
मिरकरवाडा भविष्यात राज्यातील सर्वाधिक उत्पन्न देणारे बंदर ठरेल, याचा मला विश्वास आहे. त्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अशावेळी अवैध मासेमारीला आळा घालतानाच आमचा छोटा मच्छीमारही मोठ्या मच्छीमारासारखाच जगला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे असे सामंत यांनी स्पष्ट केले.
कोकणचा सुपुत्र मत्स्य व्यवसायासाठी जीव ओतून काम करतो, हे कोकणासाठी भाग्य आहे. रत्नागिरी जिह्यातील तीन मोठी बंदरे आहेत़ यामध्ये नाटे, हर्णे नाटे आणि मिरकरवाडा बंदराचा समावेश आह़े नाटे व हर्णे बंदरासाठी 200 कोटींचा निधी मंजूर झाला असून, मिरकरवाडासाठी 100 कोटी ऊपयांची तरतूद करण्यात आली आह़े भविष्यात मिरकरवाडा कर्नाटकच्या मलपीपेक्षा मोठं बंदर होईल यात दुमत नाही.त्यामुळेच माझ्या मतदारसंघात होणाऱ्या मत्स्य विकासासाठी, मच्छीमारांचं भवितव्य घडवण्यासाठी माझे नेहमीच सहकार्य असेल, असे सामंत यांनी सांगितले.
काही लोक मच्छीमारांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत़ मात्र 15 ऑगस्टला मिरकरवाडा येथील मच्छीमार भारतीय जवानांसाठी रक्तदान करतात् हे विसरता कामा नय़े मच्छीमारांना चांगले दिवस आणण्यासाठी जे प्रयत्न केले मंत्री राणे यांच्याकडून केले जात आहेत त्याला तालुक्याचा आमदार म्हणून डोळे झाकून आपण सोबत आहोत अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी दिल़ी
दगड तयार कऊन ते पाण्यात टाकले जात आहेत त्याचा परिणाम मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना होत आहेत त्यांसंबधी लवकरच बैठक घेऊन निर्णय घ्यावा लागेल असे सामंत यांनी सांगितल़े कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना शहर अध्यक्ष बिपीन बंदरकर, माजी नगरसेवक सुहेल मुकादम, राजन शेट्यो आदी उपस्थित होत़े








