वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉकी इंडियाच्या 15 व्या उपकनिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेला चेन्नईतील एमआरके हॉकी स्टेडियमवर सोमवारपासून प्रारंभ होत आहे. सदर स्पर्धा 8 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेसाठी हॉकी इंडियातर्फे नव्यानेच विभागीय पद्धतीचा अवलंब पहिल्यांदाच अमलात आणला जाईल.
चालू वर्षाच्या प्रारंभ झालेल्या पुरुष आणि महिलांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत तसेच त्यानंतरच्या महिलांच्या उपकनिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धेत पहिल्यांदाच नव्या विभागीय स्तरीय फॉरमॅटचा अवलंब करण्यात आला होता. 15 व्या हॉकी इंडियाच्या उपकनिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय स्पर्धेत एकूण 29 संघांचा समावेश असून हे संघ तीन गटात विभागण्यात येणार आहेत.









