आज शपथविधी समारंभ
पेडणे : गोव्याचे नियोजित राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांचे काल शुक्रवारी सायंकाळी मोपा विमानतळावर आगमन झाले. सरकारतर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. आज शनिवारी सकाळी 10 वा. राजभवनात होणाऱ्या खास समारंभात त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. मोपा विमानतळावर उतरल्यानंतर शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो तसेच पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ तसेच गोव्याची पारंपरिक शाल घालून स्वागत केले. राज्यपाल सपत्नीक गोव्यात आले आहेत. यावेळी पेडणे पालिकेचे नगराध्यक्ष मनोज हरमलकर, तांबोसे मोपा उगवेचे सरपंच सुबोध महाले आदी उपस्थित होते.









