आमदारांसह जि. पं. सीईओंची भेट
बेळगाव : सरदार्स हायस्कूल व पदवीपूर्व कॉलेज परिसरात अनेक विकासकामे राबविली जात आहेत. विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शिक्षण विभागाकडून नवीन वर्गखोल्या तसेच उपक्रम राबविले जात आहेत. शुक्रवारी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ व जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी सरदार्स हायस्कूलला भेट देऊन तेथील कामाची पाहणी केली. जिल्हा पंचायतीच्या फंडातून शहरातील अनेक शाळांमध्ये विकासकामे राबविली जात आहेत. शाळांच्या छताला गळती लागू नये यासाठी पत्रे घालण्यात येत आहेत. त्याचबरोबर नवीन वर्गखोल्या, प्रयोगशाळा उभारल्या जात आहेत. या कामांची पाहणी जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी केली. यावेळी गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
आमदारांची कणबर्गीला भेट
आमदार असिफ सेठ यांनी कणबर्गी येथे भेट दिली. यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेत पावसाळ्याच्या दिवसात उद्भवणाऱ्या समस्यांची माहिती घेतली. त्याचबरोबर गावातील व्यायामशाळेला भेट देऊन तेथील साहित्याची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थ तसेच माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.









