सोने-हिरे दागिन्यांची विक्री करणारी मोठी शोरुम : ब्रँड अॅम्बॅसिडरकडून शुभेच्छा
बेळगाव : मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने ‘नुवा बाय माईन डायमंड्स’ हा नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट अशा नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांच्या संग्रहाचा शुभारंभ केला. बेळगावमध्ये झालेल्या या कार्यक्रमात असिस्टंट स्टोअरहेड फताह के. पी., असिस्टंट स्टोअर मॅनेजर सूरज अणवेकर, तसेच पाहुण्या म्हणून दीप्ती जानू, प्रियांका कोकणे व पलक पाटील उपस्थित होत्या. मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ही सोने आणि हिरे दागिन्यांची विक्री करणारी मोठी शोरुम आहे. मलाबारच्या ब्रँड अॅम्बॅसिडर करिना कपूर-खान या असून त्यांनी नुवा कलेक्शनसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नवता व परंपरा तसेच समकालीन शैलीतील डिझाईन्सने मलाबारचे दागिने सजले आहेत. यामध्ये ईअरिंग्ज तसेच टू इन् ा वन रिंग्ज, नेकलेस, बांगड्या यासह अनेक दागिने आहेत.
अडीचशेहून अधिक शोरुम्समध्ये दागिने उपलब्ध
मलाबारच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या अडीचशेहून अधिक शोरुम्समध्ये हे दागिने उपलब्ध आहेत. नुवाचा प्रत्येक दागिना हा अत्यंत कल्पकतेने डिझाईन केला आहे. यामध्ये वापरलेला 0.30 पेक्षा अधिक कॅरेटपेक्षा जास्त वजनाचा प्रत्येक हिरा गुणवत्तेसाठी दोन वेळा सर्व त्या प्रक्रियेतून घडवला जातो.
दागिन्यांमध्ये प्रादेशिक अभिरुची अन् आवड याचा संगम
या कलेक्शनबद्दल मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, अमूर्त आणि समकालीन अशा दागिन्यांचे स्वरुप आजच्या आधुनिक महिलांच्या पसंतीवर भर देऊन घडविण्यात आले आहेत. डिझाईनमध्ये सर्वोत्तम परंतु वापरण्यास हलके असे त्यांचे स्वरुप आहे. प्रादेशिक अभिरुची आणि आवड याचा संगम या दागिन्यांमध्ये करण्यात आला आहे.









