दुशेरे :
परिस्थिती आणि संकट एकत्र आलं की, त्यावर स्वार होऊन मात करणे, हा एकमेय मूलमंत्र घेऊन शेणोली (ता. कराड) येथील प्रियांका अविनाश जाधव या जंघ मुलीने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे. इयता पानवीत असताना तिम्या डोळ्यातील अंगत्व वाठलं आणि तिच्या नशियातील नेत्रसुखच हरवत गेले. मात्र या संकटामुळे तिने हार न मानता जिद्द, निकाटी आणि कट करण्यामध्ये थोडी सुद्धा उसंत बेहाली नाही. तिच्या यान जिद्दीच्या प्रवासात तिला नुकतेत महसूल सहाय्यक पदान्या परीक्षेतून यशाने गोड फळ मिळाले आहे.
वडील अविनाश व आई सुजाता या दाम्पत्यास प्रियांका आणि प्रसाद डी दीन मुले वडील बजाज ऑटो कंपनीत नोकरीस असल्याने तिच्यासह भाऊ प्रसादचे सर्व शिक्षण पुण्यात झाले. प्रियांकाने बेरगाव (पुणे) येथील प्रेरणा हायस्कूल व लोकमान्य टिळक विद्यालयात वहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, ती इयत्ता पाचवीत असताना तिश्या वृष्टीतील अंधत्व वाढत गेले आणि तिला पूर्णतः अंगपणा आला.
अशा परिस्थितीत आई-वष्ठितांनी तिचे शिक्षण सुरुच ठेवले. शाळेत शिकवलेले न विसरता ती लक्षात ठेवायमी, शाळेतून घरी आल्यानंतर आई सी सुजाता या तिचा वाचन करण्यापासून लेखनापर्यंतचा सर्व भार स्वतः पेलायच्या, सहाय्यक लेखनिकाच्या मदतीने तिने सर्व वर्गाची परीक्षा दिली. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत तिला या कामात अडसर झाला. त्यावरही मात करत तिने प्रयत्न सोडले नाहीत. परीक्षा मंडळाने मान्य केलेल्या लेखनिकाच्या मदतीने तिने वहावी व बारावीची परीक्षा दिली.
दहावीत चांगल्या गुणांनी तर चारावीच्या परीक्षेत ती महाविद्यालयात प्रथम आली. त्यानंतर पुणे येथील श्रीमती नातीबाई ठाकरसी महिला विद्यापीठातून तिने बीए (अर्थशास्त्र) पदवी संपादन केली. पदवीच्या तिसन्या वर्षात असताना नातेवाईकांनी दिलेला सल्ला तिने मनावर घेतला. शासकीय सेवेत विव्यांगांना आरक्षण असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाल्यानंतर तिने पदवी पूर्ण करतान लोकसेवा व राज्यसेवेच्या परीक्षची तयारी सुरू केली. यावेळेस तिला परिस्थितीचा अडसर झाला, परंतु नातेवाईक, मित्र-मैत्रिणी व गावातील मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे यांनी मोलाची मदत केली. इस्लामपूर (जि. सांगली) येथील अभ्यासिकेमध्ये प्रवेश घेऊन तिने अभ्यासाला सुरुवात केली. तिचे मैत्रीण सरिता व तिचा भाऊ अभिजीत निवास निकम या दोघांनी मोठी साथ दिली. सरिता व अभिजीतने विचा अभ्यास घेण्यापासून लेखन कामापर्यंत शिण्यासाठी दिवस-रात्र कष्ट पेराले.
प्रियांकाने आतापर्यंत राज्यसेवा व लोकसेवा आयोगाच्या शासकीय सेवेतील चार पांसाठी परीक्षा दिल्या आहेत. कर सहाय्यक पदासाठी नुकतीभ परीक्षा दिली आहे. महसूल सहाय्यक पदात्या परीक्षेत ती यशस्वी झाली आणि तिच्या कुटुंबात आनंदाला उधाण आले. गुलालाची उधळण करत आनंदही साजरा करण्यात आला. तिच्या यशाबद्दत सर्वत्र कौतुक होत आहे.
- कष्टाला न घाबरता ध्येय गाठण्यासाठी अभ्यास सुरू ठेवा
डोळ्यातील अंधत्वामुळे अभ्यास करताना डोळ्यात सतत पाणी यायचे. अशा परिस्थितीत मला परख्या लोकांनी खूप मदत केली. त्यांच्या मवातीची ऊगी महा प्रेरक ठरली. कोणतेही काम मनापासून केलं आणि मनातून ठरवलं की, सर्व गोष्टी जुळून येतात कष्टला न घाबरता ध्येय गाठण्यासाठी अभ्यास सुरू ठेवला पाहिजे काहीही होऊ या, आपले प्रयत्न सोडू नका.
-प्रियांका जाधव








