भाजप जिल्हाध्यक्षांचे कार्यकर्त्यांना आवाहन
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील जिल्हा व तालुका पंचायत निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचवून नागरिकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचे आवाहन भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केले. रविवारी भाजप कार्यालयात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुका येत्या काही दिवसांत होणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या निवडणुकांसाठी तयार राहावे.









