मेंढ्यांची विक्रमी दराने विक्री झाल्यानंतर चक्क डॉल्बी लावून रथातून गुलालाने मिरवणूक
आटपाडी: आटपाडी बाजार समितीच्या आठवडा बाजारात मेंढ्या, बकऱ्यांना विक्रमी वर मिळण्याची परंपरा कायम असून शेतकऱ्यांचा हा आनंदोत्सव लक्षवेधी ठरला. आटपाडी तालुका खिलार जनावरे, शेळ्या, मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिध्द आहे.
आटपाडीमध्ये शेळ्या-मेंढ्यांचा बाजार, यात्रा, खरसुंडी व करगणी-तील जनावरांची यात्रा महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशपर्यंत प्रसिध्द आहे.उच्चांकी दरानंतर मेंढपाळांसह जल्लोष करताना जिल्हा बँक संचालक तानाजी पाटील, सभापती संतोष पुजारी या शेतकऱ्यांच्या बकऱ्यांना मिळालेला उच्चांकी दर आणि त्यांचा जल्लोष कौतुकाचा विषय बनला.त्यामुळे शेतकर्यांनी डॉल्बी लावून जल्लोष केला.
सात महिने वयाच्या मेंढीला ३२ हजार ५०० रूपयांप्रमाणे दर मिळाला. या दराने नऊ मेंढ्या सुरेश महादेव पुजारी (पुजारवाडी आ.) यांनी खरेदी केल्या.
जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, सभापती संतोष पुजारी, सुबराव पाटील, तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत मेंढपाळांचा गौरव करण्यात आला. शेतकरी, पशुपालक, मेंढपाळ बांधवांनी आटपाडी बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती संतोष पुजारी यांनी केली आहे.








