प्रवाशांना चिपी ऐवजी मोपा विमानतळावर उतरविले
परूळे |प्रतिनिधी
खराब हवामानामुळे बेंगलोर व्हाया पुणे चिपी सिंधुदुर्ग विमान सेवा आज शनिवारी रद्द करण्यात आली . प्रवाशांनी भरलेले हे विमान मोपा विमानतळावर उतरविण्यात आले व या विमानातून सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रवाशांना कारने सिंधुदुर्ग विमानतळावर सोडण्यात आले .तर सिंधुदुर्गहून विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोपा विमानतळावर कारने सोडण्यात आले. खराब हवामानाचा फटका प्रवाशांना बसला असून त्यांना अधिकचा तीन तासाचा प्रवास करावा लागला.









