रत्नागिरी :
तालुक्यातील निवळी शिंदेवाडी येथे रान साफ करताना जमिनीवर पडलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाल़ा ही घटना गुऊवारी दुपारी घडल़ी विदुलता वासुदेव वाडकर (61) व चंद्रकांत यशवंत तांबे (43, ऱा निवळी शिंदेवाडी, रत्नागिरी) अशी मृतांची नावे आहेत़ या घटनेची माहिती मिळताच निवळी ग्रामस्थांनी जिल्हा ऊग्णालय येथे मोठी गर्दी केली होत़ी शुक्रवारी दुपारी दोन्ही मृतांवर निवळी येथे शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आल़े
महावितरणच्या गलथान कारभाराचे हे बळी ठरल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आला आह़े तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांविऊद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थ व कुटुंबियांकडून करण्यात आली आह़े दरम्यान ग्रामस्थांचा रोष लक्षात घेता महावितरणकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख ऊपयांची नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आल़े तसेच अधिकच्या नुकसान भरपाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आल़े

- आंबा बागेत आढळले मृतदेह
गुऊवारी सायंकाळी निवळी शिंदेवाडी येथील वसंत सीताराम मुळ्यो यांच्या आंबा बागेत चंद्रकांत तांबे व विदुलता वाडकर यांचे मृतदेह पडल्याचे स्थानिक महिलेला दिसून आल़े त्यानुसार त्यांनी या घटनेची खबर गावच्या पोलीस पाटील यांना दिल़ी घटनेची माहिती निवळी ग्रामस्थांना समजताच खळबळ उडाल़ी सर्वांनी मुळ्यो यांच्या आंबा बागेकडे धाव घेतल़ी तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आल़े पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा ऊग्णालयाकडे पाठवल़े
- महावितरणच्या गलथानपणाचे ठरले बळी
विदुलता वाडकर यांच्या घराकडे जाणारी विजेची तार पडल्याने त्यांची घरी अंधार झाला होत़ा याप्रकरणी त्यांनी महावितरणकडे तक्रार दाखल केली होत़ी मात्र वीज प्रवाह बंद न करता महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज वाहिनीची वाट साफ करून घ्या, असे विदुलता यांना सांगितल़े वेळीच महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज वाहिनीचा प्रवाह बंद केला असता तर पुढील अनर्थ घडला नसत़ा
- विदुलता यांनी दोन दिवस अंधारात काढले
विद्युत तार पडल्याने विदुलता यांच्या घरी दोन दिवसांपासून लाईट गेली होत़ी यासबंधीची तक्रार त्यांनी महावितरणकडे केली होत़ी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र कोणतेही काम न करता वाट साफ करून द्या, असे विदुलता यांना सांगितल़े दोन दिवस अंधारात काढल्यानंतर अखेर कंटाळून विदुलता यांनी रान साफ करण्याचा निर्णय घेतल़ा त्यासाठी त्यांनी गावातील चंद्रकांत तांबे यांना कामासाठी बोलावले होत़े त्यानुसार गुऊवारी सकाळी चंद्रकांत हे रान साफ करण्यासाठी वसंत मुळ्यो यांच्या आंबा बागेत आले होत़े
- शॉक लागून दोघांचा झाला मृत्यू
वसंत मुळ्यो यांच्या आंबा बागेत वीजवाहिनीच्या मार्गातील रान साफ करताना चंद्रकांत यांना अचानक विद्युतभारित तारेचा धक्का लागल़ा जीव वाचविण्यासाठी चंद्रकांत यांनी धडपड केल़ी मात्र विजेची तार चंद्रकांत मानेला चिकटली होत़ी यातच चंद्रकांत यांचा मृत्यू झाल़ा चंद्रकांत यांची धडपड पाहून विदुलता या चंद्रकांत यांचा वाचविण्यासाठी पुढे आल्या असता त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला व त्यांचा मृत्यू झाल़ा दोघांचेही मृतदेह लागूनच पडले होत़े
- सायंकाळी उशिरा उघडकीस आली घटना
घटनास्थळ हे वस्तीपासून दूर असल्याने तसेच पावसाळ्dयात रान वाढल्याने या ठिकाणी जास्त कुणाची ये-जा नव्हत़ी त्यामुळे दिवसभर या घटनेविषयी कुणाला काही माहिती मिळू शकली नाह़ी निवळीतील एक महिला वसंत मुळ्यो यांच्या आंबा बागेतून जात असताना चंद्रकांत व विदुलता दोन्ही मृत अवस्थेत आढळल़े मृतांना पाहून या महिलेची बोबडी वळाल़ी त्या ठिकाणाहून पळत सुटत त्यांनी थेट घर गाठल़े तसेच घटनेची खबर गावच्या पोलीस पाटील व ग्रामस्थांना दिल़ी
- ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल
वीज वाहिनीचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाल्याची खबर मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल़े घटनेचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा ऊग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल़े शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांचा मोठा जमाव जिल्हा ऊग्णालय येथे दिसल़ा त्याचप्रमाणे महावितरणचे कर्मचारीही जिल्हा ऊग्णालय येथे दाखल झाले होत़े
- मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत
ग्रामस्थांचा रोष लक्षात घेऊन जिल्हा ऊग्णालय येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने 20 हजार ऊपये व 4 लाख ऊपयांची मदत मृतांच्या नातेवाईकांना देण्याचे मान्य केल़े त्याचप्रमाणे वाढीव नुकसान भरपाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव देण्यात आल्याचेही महावितरणकडून यावेळी सांगण्यात आल़े
- विदुलता यांच्या निधनाने बहिणीवर दु:ख अनावर
विदुलता या अविवाहित असून बहिणीसोबत निवळी येथे वास्तव्य करत होत्य़ा दोघी बहिणींचा एकमेकांना आधार होत़ा गुऊवारी विदुलता यांची बहीण रत्नागिरीत कामासाठी आली होत़ी तर विदुलता या रान साफ करून घ्यायचे असल्याने घरी थांबल्या होत्य़ा सायंकाळी घरी आल्यानंतर विदुलता यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळल़ा
- निवळीत शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार
शुक्रवारी दुपारी चंद्रकांत व विदुलता यांचे मृतदेह शवविच्छेदन करून निवळी येथे नेण्यात आल़े विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाल्याने निवळी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत होत़ी शुक्रवारी दुपारी मृतांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आल़े यावेळी गावचे सरपंच, पोलीस पाटील तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होत़े








