बेळगाव : बीएससी मॉलच्या डबल डिस्काऊंट सेलला ग्राहकांचा दिवसेंदिवस वाढत प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन वर्षात कपडे खरेदीसाठी ग्राहकांची प्रथम आवड आणि आकर्षण म्हणून बीएससी मॉल नावारुपास आला आहे. 365 दिवस 10 टक्के विशेष सूट देण्यात येतच आहे. आता बीएससीकडून श्रावण उत्सव डबल डिस्काऊंट देण्यात येत आहे. डबल डिस्काऊंट म्हणजे 10 टक्के विशेष सूट तर सदैव असतेच, त्यासोबतच आता ग्राहकांना श्रावण उत्सवाच्या निमित्ताने आणखी 10 टक्के सूट मिळणार आहे. हे डिस्काऊंट नवनवीन कपड्यांच्या खरेदीवर असणार आहे. खास आकर्षण म्हणजे डबल डिस्काऊंटमधील स्पेशल काऊंटर असून तेथे अविश्वसनीय किमतीमध्ये सारिज, लेडिज वेअर, मेन्स वेअर कपडे ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. यामुळे ग्राहकांनी बीएससी मॉलला आवर्जुन भेट देऊन डबल डिस्काऊंटचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जून 2022 मध्ये अतिभव्यतेने शहरातील टिळकवाडी येथील पहिल्या रेल्वे गेटजवळ बीएससी द टेक्स्टाईल मॉल उभारण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षात बीएससी ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून खरेदीसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. बीएससी मॉल अतिशय सोईस्करपणे स्थित 1 लाख चौरस फूट आकाराचा पाच मजली आहे. मॉलमध्ये कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी फॅशनच्या कपड्यांचे विस्तृत पर्याय आहेत. एवढा बलाढ्या मॉलसुद्धा ग्राहकांच्या गर्दीपुढे कमी भासतो. हा मॉल बी. एस. चन्नबसप्पा अॅण्ड सन्सच्या 87 वर्षांच्या जुन्या टेक्स्टाईल हेरिटेज ब्रँडचा एक प्रकल्प आहे. विशेष म्हणजे बीएससी मॉलमध्ये लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्व वयोगटातील आणि सर्व श्रेणींसाठी अगदी योग्य दरात कपडे उपलब्ध आहेत. कापड म्हणजे बीएससीचे, असे सर्व ग्राहक म्हणतात.
बीएससी मॉलमध्ये येणाऱ्या सर्व सणांसाठी आणि लग्नाचा सीझन लक्षात ठेवून फ्रेश एक्सक्लुसिव्ह फॅशनेबल स्टॉक ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतो. तळमजल्यावर कॉटन आणि सिंथेटिक मटेरिअलने बनविलेल्या साड्या, रेशमी साड्या, कांचीपूरम, धर्मावरम, बनारसी सिल्क साड्यांसह ब्रायडल लेहेंगा आणि गाऊन यांची विस्तृत श्रेणी आहे. दुसऱ्या मजल्यावर खास महिलांसाठी आवडीचा मोठा स्टॉक आहे. येथे चुडीदार, लेडिज एथनिक वेअर, वेस्टर्न वेअर, इनरवेअर, इमिटेशन ज्वेलरी, कॉस्मेटिक अणि होम फर्निशिंग यामध्ये बेडशीट्स, टॉवेल्स, योगामॅट्स, ब्लँकेट, चादर, जमखाने आदी साहित्य तर आहेच, शिवाय ग्राहकांच्या आग्रहास्तव बीएससी मॉलने इमिटेशन ज्वेलरीसोबतच अस्सल चांदीची ज्वेलरी, चांदीमध्ये बनविलेल्या भेटवस्तूंचा विभाग सुरू करण्यात आला आहे.
तिसऱ्या मजल्यावर पुरुषांसाठी नामांकित मिल्सचे सुटिंग, शर्टिंग फॅब्रिक कलेक्शन, धोती सेट्स, सन्मान शॉल्स, हार, फेटे, गांधी टोपी, धोतर, पुजामडी यासह चिमुकल्यांसाठी मोठी फॅशन उपलब्ध करून दिली आहे. येथे अगदी नवजात शिशूंपासून ते वयस्कर व्यक्तींकरिताही कपडे भेटतात. बच्चे कंपनीसाठी खेळणी, बोर्ड गेम्स उपलब्ध करून देण्यात आला आहे. चौथा मजला हा केवळ पुरुषांसाठी बनविलेला आहे. येथे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे पोशाख ज्यामध्ये फॉर्मल, एथनिक, पार्टी यासह शॉर्ट्स, जीन्स, कुर्ता, पायजमा, शेरवाणी, 3 पीस, 5 पीस सूट, ब्लेझर, इनरवेअर यासोबतच हॅण्डवॉच, पर्फ्यूम अशा विविध वस्तू उपलब्ध आहेत. यामुळे डबल डिस्काऊंटचा लाभ घेण्यासाठी बीएससी मॉलला नक्की भेट देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.









