बेळगावच्या ज्युडो प्रशिक्षका रोहिणी पाटीलसह इतर प्रशिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन
बेळगाव : तैवान येथील तैपै येथे झालेल्या ज्युनिअर एशियन ज्युडो स्पर्धेत भारतीय संघाने पाच सुवर्ण, चार रौप्य, दोन कास्यसह 11 पदकांची लयलूट केली आहे. तैवान येथे झालेल्या या ज्युनिअर एशियन ज्युडो स्पर्धेत महिलांच्या विभागात 52 किलो वजनी गटात मुगोशितहोली हिने सुवर्णपदक, 57 वजन गटात शाहीनने सुवर्णपदक, 63 किलो वजनी गटात हिमांशी टोकास हिने सुवर्णपदक, 70 किलो वजनी गटात तायबान गानबी हिने सुवर्णपदक, 78 किलो वजनी गटात ईशरूप नारंग हिने सुवर्णपदक तर 78 वरील वजनी गटात कनव्हर प्रितकौर हिने रौप्यपदक पटकाविले. या स्पर्धेत सहा महिलांनी भाग घेतला होता. त्यामध्ये 5 जणांनी सुवर्ण तर एकटीने रौप्यपदक पटकाविले. पुरूष विभागात 60 किलो वजनी गटात हिमांशने रौप्यपदक, 73 किलो वजनी गटात फरदीनने कांस्यपदक, 81 किलो वजनी गटात आदित्य सोळंकीने रौप्यपदक, 90 किलो वजनी गटात शीतलने रौप्यपदक, तर 100 किलोवरील गटात क्रिश राखोलियाने कांस्यपदक पटकाविले. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक विवेक ठाकुर, गुनामानी मितीही, बेळगावची रोहिणी पाटील व अमित वैग्य यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले आहे. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पदके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.









