संगमेश्वर :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वरनजीक ओझरखोल येथे गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता चिपळूणहून रत्नागिरीला जाणारी खासगी मिनी बस आणि रत्नागिरीहून चिपळूणकडे जाणाऱ्या मंडणगड डेपोच्या एसटीची समोरासमोर धडक झाली. यामध्ये मिनी बस व एसटीमधील एकूण 30 प्रवासी जखमी झाले.
गंभीर जखमी प्रवाशांवर संगमेश्वर ग्रामीण ऊग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा ऊग्णालयात पाठवण्यात आले. गंभीर जखमी झालेला चालक किरण रहाटे याला अधिक उपचारासाठी चिपळूण येथे हलविण्यात आले आहे.
दोन्ही बसमधील जखमींमध्ये किरण रहाटे (मिनी बस चालक), अतुल पांडुरंग पिटले-सावर्डे, आशिष प्रमोद विभुते-देवऊख (मिनी बस क्लिनर), तन्वी (संपूर्ण नाव समजले नाही)-चिपळूण, सायली संतोष हेगडे – निवळी, अनिश अनिल पाटणे-कोळंबे, आयुष संजय मयेकर-मिऱ्या रत्नागिरी, मंगेश विजय दुधाणे (एसटी वाहक), सचिन बाबासाहेब केकान (ओझरखोल), संतोष तानाजी गायकवाड, रामचंद्र फेपडे, रघुनाथ पाठक, राजू चोचे, शेखर सतीश साठे, सुशील धोंडीराम मोहिते, सरिता धोंडीराम मोहिते, अजय रामदास भालेराव, अनुराधा शिवाजी धनावडे, विनय विश्वनाथ प्रसादे, सुशील दत्ताराम मोहिते, उमामा मुल्लाजी, अनिकेत अनंत जोगले, किरण राठी, रामचंद्र बाबू, वैशाली सिद्धार्थ सावंत, अर्हता संतोष सावंत, केतन श्रीकृष्ण पवार, सिद्धार्थ गोपाळ सावंत, सारा हबीब फकीर, अण्णा बाबासाहेब पवार आदींचा समावेश आहे. यातील 6 प्रवाशांना गंभीर स्वरुपाची इजा झाली.
चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणारी खासगी मिनी बस (एमएच 08 एपी 4527) आणि रत्नागिरीहून चिपळूणच्या दिशेने निघालेल्या एसटीची (एमएच 20 बीएल 4038) ओझरखोल येथील वळणावर समोरासमोर धडक झाल्यानंतर अपघातस्थळी संगमेश्वर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण व त्यांचे सहकारी तातडीने मदतीसाठी धावले. ओझरखोल येथील स्थानिक ग्रामस्थ व अनेक वाहन चालक जखमींना बसमधून बाहेर काढण्यासाठी मदत करत होते. संगमेश्वर ग्रामीण ऊग्णालयातून 108 नंबरच्या ऊग्णवाहिका अपघातस्थळी दाखल झाल्या. यातून सर्व जखमींना संगमेश्वरच्या ग्रामीण ऊग्णालयात दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सर्व जखमींवर उपचार केले. दोन्ही बसचे चालक केबिनमध्ये अडकले होते. यामध्ये मिनी बसच्या चालकाचे दोन्ही पाय अपघातानंतर खूप काळ अडकले होते. उपस्थित सर्वांनी अथक प्रयत्नानंतर मिनी बस चालकाची सुटका केली. क्रेन आणि जेसीबी बोलावून या चालकांची सुटका करण्यात आली.
या अपघातप्रकरणी संगमेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनास्थळी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी किशोर जोयशी, विनय मनवल, कोलगे, वांद्रे, खडपे, वाहतूक शाखेचे पोलीस मुजावर व स्थानिक ग्रामस्थांनी मदत केली. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील डायव्हर्जनची स्थिती बदलल्यामुळे घडल्याचे बोलले जात होते.








