वृत्तसंस्था/ताश्कंद
भारताचा 20 वर्षांखालील वयोगटातील महिलांचा फुटबॉल संघ सध्या ताश्कंदच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील येथे खेळविण्यात आलेल्या मित्रत्वाच्या दुसऱ्या व शेवटच्या सामन्यात भारताने उझ्बेकचा 4-1 असा दणदणीत पराभव केला. भारत आणि उझ्बेक यांच्यातील या मित्रत्वाच्या फुटबॉल सामन्यात मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. या दौऱ्यातील उभय संघातील पहिला सामनाही 1-1 असा बरोबरीत राहिला होता. बुधवारच्या दुसऱ्या सामन्यात भारतातर्फे एन. सिबानीदेवीने 28 व्या आणि 85 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. सुलंजना राऊलने 65 व्या मिनिटाला तसेच नेहाने 71 व्या मिनिटाला गोल नोंदवित उझ्बेकचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. उझ्बेकतर्फे एकमेव गोल 37 व्या मिनिटाला शेकानोझा डेकेनबेव्हाने केला.









