एकाचवेळी 252 वाहने होणार चार्ज : मुंबई आणि दिल्लीमध्ये होणार सुरुवात
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिग्गज अमेरिकन वाहन कंपनी टेस्ला यांची भारतामधील पहिली शोरुम मुंबईत 15 जुलैपासून सुरु झाली आहे. यावेळी कंपनीने भारतीय बाजारात आपली प्रसिद्ध कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही मॉडेल वाय बाजारात आणली आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 60 लाख रूपये आहे. याशिवाय कंपनीने शोरुमजवळ एक सर्व्हिस सेंटर आणि गोडाउन देखील सुरु केले आहे. कंपनी आता नव्या शोरुमसोबत मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी जवळपास 8 चार्जिंग स्टेशन्सची व्यवस्था करणार असल्याची घोषणाही कंपनीने केली आहे. सदरच्या चार्जिंग केंद्रांमध्ये साधारण एकाचवेळी 252 इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग होणार आहेत. कंपनी भारतातील इतर मॉडेल लाँच करण्यासाठी इतर प्रमुख शहरांमध्ये शोरुम्स सुरु करणार आहे.
टेस्ला समोर पाच मुख्य आव्हाने
- अधिकचे आयात शुल्क आणि किंमत :
- टेस्लाची गाडी सीबीयू (कम्पील्ट्ली बिल्ट युनिट) म्हणून आयात होणार आहे. यामध्ये आयात शूल्क आणि जीएसटी लागू होणार असून त्या प्रमाणात किंमती राहणार आहेत. यामुळे ग्राहकांसाठी गाडी खरेदी करणे महाग होणार आहे.
- चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर: टेस्लाने मुंबई आणि दिल्लीमध्ये 8 सुपरचार्जिंग स्टेशनची योजना तयार केली आहे.
- ग्राहकांचे वर्तन : भारतीय ग्राहक सेवा आणि पुर्नविक्रीला प्राथमिकता दिली आहे.
- सर्व्हिस आणि डीलरशिप नेटवर्क: टेस्लाचे डायरेक्ट-टू-कंझ्यूमर सेल्स मॉडेल (ऑनलाइन सेल्स) भारतामध्ये नवे आहे. बीएमडब्लू, मर्सिडीज आणि टाटा सारख्या ब्रँड्सचे मजबूत नेटवर्क सर्व्हिस सेवा विक्रेता आणि टेस्लासाठी आव्हान असणार आहे.
- लोकल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये विलंब: टेस्लाची गुजरात/कर्नाटकमध्ये प्रस्तावित गीगाफॅक्ट्री 2026-2027 पासून प्रथम प्रारंभ होण्याची शक्यता कमी आहे. या कारणामुळे गाडीची किंमत ही आयातीवरच अवलंबून राहणार आहे.









