बेळगाव : नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर संत मीरा शाळा गणेशपुर हिंडलगा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय अॅथलेटिक प्राथमिक मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन मोट्या उत्साहात झाले. या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून मि. इंडिया एकलव्य पुरस्कार विजेते सुनील आपटेकर, बेळगांव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार, संत मीरा गणेशपुर शाळेचे अध्यक्ष डॉ विजय गोवेकर, सचिव देवीप्रसाद कुलकर्णी, मुख्याध्यापिका आरती पाटील, विद्याभारती जिल्हा अध्यक्ष माधव पुणेकर, उपाध्यक्ष रामनाथ नाईक, सी.आर. पाटील, चिंतामणी ग्रामोउपाध्ये, श्वेता पाटील, आशा भुजबळ, श्रीकांत कांबळे, उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहन दीप प्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले. शालेय खेळाडू कृषी पावले, श्रेया राजूकर, तन्वी येळ्ळूरकर, अश्विनी पाटील, खंडू पाटील, प्रेम चौगुले, प्रेम मोरारी, राजवर्धन भुजबळ यांनी मैदानाभोवती क्रीडा ज्योत फिरवून पाहुण्यांचेकडे सुपूर्द केले, भूमी चौगुलेने खेळाडूंना शपथ दिली.
या वेळी प्रमुख पाहुणे सुनिल आपटेकर म्हणाले खेळ कोणताही असो व्यायाम हा केला पाहिजेत. व्यायाम जीवनशैली बनली पाहिजे शालेय जीवनात अभ्यासाबरोबर व्यायामाला महत्त्व देणे गरजेचे आहे शालेय प्रशिक्षकांचे मार्गदर्शनाखाली सराव केल्यास यश नक्की मिळते यश प्राप्त झाले नाही तरी आपली प्रकृती सुदृढ राहू शकते यासाठी यशाला शॉर्टकट नाही दिग्गज खेळाडूंचे फक्त यश न पाहता त्यांनी घेतलेल्या परिश्र्रमाचे अनुकरण ही करणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले तर अविनाश पोतदार यांनी खेळाडूंना सचिन तेंडुलकरचे उदाहरण देत एक चांगला खेळाडू निर्माण होण्यास प्रयत्न करावे असा सल्ला दिला. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला या प्रसंगी अनिता नाईक, मंजुनाथ भुजंगण्णावर, अमृता चिदगी, शिवकुमार सुतार, यश पाटील, अभिषेक गिरिगौडर, सिद्धांत वर्मा, ओमकार गावडे प्रशांत वांडकर, जयसिंग धनाजी, बापू देसाई, मॅथ्यू लोबो, हर्ष रेडेक उपस्थित होते या स्पर्धेत संत मीरा अनगोळ, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, संत मीरा गणेशपुर हिंडलगा, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर ,गजाननराव भातकांडे स्कूल, देवेंद्र जिनगौडा स्कूल हनिवेल स्कूल खानापूर शाळेच्या संघानी भाग घेतला होता.









