सातारा :
बुधवारी दुपारी शहरात दोन ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या. दोन्ही घटनांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. बसस्थानकाच्या बाहेर रिक्षा चालकांमध्ये भाड्यावरुन तर रविवार पेठेत मरिआई कॉम्प्लेक्स इमारतीच्या पाठीमागील इमारतीत हाणामारीची घटना घडली. या दोन्ही घटनांची नोंद सातारा पोलिसात झाली नाही.
सातारा एसटी स्टॅण्डच्या बाहेर रिक्षाचा थांबा आहे. तेथे दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास रिक्षा चालकांच्यामध्ये भाडे भरण्याच्या कारणावरुन हाणामारीची घटना घडली तर दुसरी घटना पोवई नाका परिसरात मरिआई कॉम्पलेक्सच्या पाठीमागे एका इमारतीत भांडणे झाली. त्यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. या दोन्ही भांडणाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. या दोन्ही घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली नव्हती.
..








