वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सोमवारी झालेल्या पहिल्या 20 वर्षांखालील महिलांच्या मैत्रीपूर्ण सामन्यात उझबेकिस्तानला 1-1 असे बरोबरीत रोखल्यानंतर भारतीय संघ बुधवारी दोस्तलिक स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 20.30 वाजता दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात यजमान संघाशी सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे.
पहिल्या सामन्याप्रमाणे, पुढील महिन्यात होणाऱ्या एएफसी 20 वर्षांखालील महिला आशियाई कप पात्रता फेरीसाठी तयारी करणाऱ्या संघांमधील परस्पर करारानुसार हा सामनाही बंद दारामागे खेळवला जाईल. उझबेकिस्तानने हाफटाइमच्या शिट्टीपूर्वी 1-0 अशी आघाडी घेतल्यानंतर सुलंजना राऊलच्या 79 व्या मिनिटाला झालेल्या बरोबरीच्या गोलमुळे यंग टायग्रेसेसचा संघ बरोबरीत सुटला.
या निकालावर विचार करताना भारताचे मुख्य प्रशिक्षक जोकिम अलेक्झांडरसन म्हणाले, त्यांचा संघ विजयास पात्र होता. परंतु संथ सुरुवातीमुळे संधीमध्ये अडथळा निर्माण झाला. आमच्या संघाने चांगला खेळ केला होता. पहिल्या 15-20 मिनिटांत आम्हाला आमच्या दडपणाशी झुंजावे लागले. आम्ही पुरेसे आक्रमक नव्हतो. पण वेळेनुसार आम्ही सुधारणा केली आणि चांगल्या बांधणी आणि हालचालीनंतर संधी निर्माण करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या हाफमध्ये आम्ही त्यांच्यावर वर्चस्व गाजवले. जरी वैयक्तिक चुकांमुळे आम्ही काही संधी गमावल्या. परंतु आम्ही त्यांच्यापेक्षा अनेक जास्त संधी निर्माण केल्या आणि निश्चितच आम्ही विजयाच्या पात्रतेचे होतो. परंतु या संधींसह तुम्हाला गोल करावे लागतील, असे एआयएफएफच्या प्रेस रिलीजमध्ये उद्धृत केलेलया स्वीडिश खेळाडूने म्हटले आहे. हा सामना मुळत: रविवारी खेळवला जाणार होता. परंतु दोस्तलिक स्टेडियमवरील ऑपरेशनल आव्हानांमुळे 24 तासांपेक्षा जास्त वेळ पुढे ढकलण्यात आला. वेळापत्रकात शेवटच्या क्षणी असामान्य बदल होऊनही यंग टायग्रेसेस मानसिकदृष्ट्या एकाग्र राहिले आणि त्यांनी त्यांचा त्यांच्या कामगिरीवयर परिणाम होवू दिला नाही.









