वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ‘उदयपूर फाइल्स’च्या प्रदर्शनाच्या मुद्द्यावर सुनावणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून स्थापन समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत चित्रपट प्रदर्शित न करण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी आता 21 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. टेलर कन्हैयालाल यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘उदयपूर फाइल्स’ प्रारंभापासून वादात सापडला आहे. कन्हैयालाल यांच्या हत्येचा आरोपी मोहम्मद जावेदने चित्रपटाच्या प्रदर्शनावर आक्षेप दर्शविला. समितीला या आक्षेपाच्या पडताळणीचेही आदेश देण्यात आले. तसेच न्यायालयाने निर्माते आणि कन्हैयालाल यांच्या पुत्राला पोलिसांची मदत घेण्यास सांगितले आहे.
काय आहे पूर्ण प्रकरण?
उदयपूर फाइल्स चित्रपट राजस्थानमधील टेलर कन्हैया लाल यांच्या हत्येवर आधारित आहे. 12 जून 2022 रोजी मोहम्मद रियाज आणि मोहम्मद गौसने धारदार अस्त्राने कन्हैयालाल यांची हत्या केली होती. दोन्ही आरोपींनी या हत्येचे चित्रण केले होते. कन्हैयालाल हत्येचा तपास एनआयए करत आहे.









