खासदार प्रियांका जारकीहोळी यांचे आवाहन
बेळगाव : यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील मसरगुप्पी, कोचरी, गोटूर, गोवनाळ या गावांमधील सरकारी शाळांच्या नवीन इमारतींचे खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी मंगळवारी उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्न आणि सकारात्मक विचारांसह उच्च ध्येये ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. आजच्या काळात मुलांना अभ्यासात फारशी आव्हाने नाहीत. सुविधांचीही कमतरता नाही. त्यामुळे त्यांनी अभ्यासात अधिक रस घ्यावा आणि यमकनमर्डी मतदारसंघ आणि बेळगाव जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही यश मिळवून त्यांचे कुटुंब आणि महाविद्यालयांना प्रसिद्धी मिळवून द्यावी.
शाळेत कोणत्याही समस्या असतील तर शिक्षकांसमोर मांडून समस्या सोडवाव्यात. उत्तम सराव करून परीक्षेचा उत्तम निकाल आणावा, असे आवाहन त्यांनी केले. खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी मसरगुट्टी आणि कोचरी गावात नवीन सामुदायिक सभागृहांचे उद्घाटनही केले. यावेळी खासदार प्रियांका जारकीहोळी यांचा शिक्षक व शालेय व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी इलियास इनामदार, महांतेश मगदुम, इमला कांबळे, हुक्केरी ता. पं. ईओ टी. आर. मल्लाडद, गुरु हिरेमठ, रावसाहेब बडमनी, अनिल कडलगी, राजू चौगला, केंपण्णा पाटील, इरगौडा पाटील, भीमगौडा पाटील, भीमाप्पा मनगुंडी, प्रकाश बस्सापुरी, ए. एस. पद्मनावर, विविध गावचे नेते व शिक्षक उपस्थित होते.









