बेळगाव : विमल फौंडेशन आयोजित बिग बॉक्स क्रिकेट लिग स्पर्धेच्या पहिल्या दिवशी स्मॅश फोर्स, पॉवरप्ले, पँथर, यॉर्कर योद्धा संघांनी आपल्या प्रतिस्पर्धांवर मात करीत प्रत्येकी 4 गुण मिळविले. विमल फौंडेशनच्या इनडोअर क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या बिग बॉक्स क्रिकेट साखळी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात स्मॅश फोर्सने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात 3 गडीबाद 26 धावा केल्या त्याला उत्तर देताना यॉर्कर योद्धाने 5 षटकात 4 गडीबाद 12 धावा केल्या. हा सामना स्मॅश फोर्सने 14 धावांनी जिंकला.
दुसऱ्या सामन्यात पॉवरप्ले पँथरने प्रथम फंलदाजी करताना 5 षटकात 5 गडी बाद 27 धावा केल्या. त्याला उत्तर देताना विराज डॉमिनेटर्सने 5 षटकात 5 गडी बाद 19 धावा केल्या. हा सामना पॉवरप्ले पँथर संघाने 8 धावांनी जिंकला. तिसऱ्या सामन्यात स्मॅश फोर्स संघाने 5 षटकात 3 गडी बाद 41 धावा केल्या. त्याला उत्तर देताना बाँड्री ब्लुस्टरने 5 षटकात 4 गडी बाद 13 धावा केल्या. हा सामना स्मॅश फोर्स संघाने 28 धावांनी जिंकला. चौथ्या सामन्यात यॉर्कर योद्धाने 5 षटकात 3 गडी बाद 41 धावा केल्या. त्याला उत्तर देताना पॉवरप्ले पँथर संघाने 5 षटकात 2 गडी बाद 28 धावा केल्या. यॉर्कर योद्धाने हा सामना 13 धावांनी जिंकला.









