34 कोटी रुपये असणार किंमत
न्यूयॉर्कमध्ये शतकातील सर्वात अनोखा लिलाव होणार आहे. जगातील प्रसिद्ध लिलाव कंपनी सोथबीज मंगळ ग्रहाचा सर्वात मोठा उल्कापिंडा एनडब्ल्यूए 16788 ला विकणार आहे. हा उल्कापिंड 24.5 किलोग्रॅमचा असून याची किंमत 2 दशलक्ष ते 4 दशलक्षापर्यंत (15 ते 34 कोटी रुपये) असू शकते. हा लिलाव 16 जुलै रोजी न्यूयॉर्कमध्ये पार पडणार आहे.
एनडब्ल्यूए 16788 एक उल्कापिंड असून तो मंगळ ग्रहावरून आला होता, नोव्हेंबर 2023 मध्ये आफ्रिकेतील नायजर देशाच्या अगादेज भागात सहारा वाळवंटात एका शिकाऱ्याने याचा शोध लावला होता. हा दगड खास आहे कारण तो पृथ्वीवर मिळालेला मंगळ ग्रहाचा सर्वात मोठा तुकडा आहे. याचे वजन 24.67 किलोग्रॅम असून तो पूर्वीच्या रिकॉर्डधारक उल्कापिंडापेक्षा 70 टक्के मोठा आहे. पृथ्वीवर आतापर्यंत 77 हजारांहून अधिक उल्कापिंड मिळाले आहेत, परंतु यातील केवळ 400 मंगळ ग्रहाचे आहेत. एनडब्ल्यूए 16788 या 400 उल्कापिंडांचा 6.5 टक्के हिस्सा आहे, म्हणजेच हा अत्यंत दुर्लभ आहे. लाखो वर्षांपूर्वी मंगळ ग्रहावर एक मोठा उल्कापात (एस्टरॉयड हिट) झाला होता, या टक्करमुळे मंगळ ग्रहाचा हा तुकडा अंतराळात फेकला गेला. कोट्यावधी किलोमीटरचे अंतर कापून हा पृथ्वीवर कोसळल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे. या उल्कापिंडाचा रंग लाल-करडा असून तो मंगळ ग्रहावरील मातीसारखा दिसतो. यातील काही हिस्स्यांमध्ये काचेसारखे आवरण आहे. जे अंतरळात वेगाने पृथ्वीच्या वायुमंडळात शिरल्याने निर्माण झाले आहे. याचा 21.2 टक्के हिस्सा मास्केलिनाइट (एकप्रकारची काच), पाइरोक्सीन आणि ओलिवाइन यासारख्या खनिजांनी निर्मित आहे.
कसे सिद्ध झाले?
या उल्कापिंडाचा छोटा तुकडा शांघाय एस्ट्रोनॉमी म्युझियममध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आला, तेथे वैज्ञानिकांची याचा आकार आणि खनिजांची तपासणी केली आणि हा मंगळ ग्रहावरून आल्याची पुष्टी दिली. जून 2024 मध्ये मेटियोराइटिकल सोसायटीने देखील याला मंजुरी दिली. याच्या पृष्ठभागावर अत्यंत कमी गंज आहे, याचा अर्थ हा पृथ्वीवर अलिकडेच कोसळला असावा.
लिलावाच्या खास बाबी
सोथबीजचा हा लिलाव गीक वीकचा हिस्सा आहे, ज्यात अंतराळ आणि विज्ञानाशी निगडित अनोख्या गोष्टी विकल्या जातात. एनडब्ल्यूए 16788 ला 15 जुलैपर्यंत न्यूयॉर्कमध्ये सोथबीजच्या शोरुममध्ये प्रदर्शित केले जाईल, जेणेकरून लोकांना तो पाहता येईल. लिलाव 16 जुलै रोजी दुपारी 2 वाजता सुरू होईल.
का आहे खास
एनडब्ल्यूए 16788 मंगळ ग्रहाची रचना आणि इतिहास समजून घेण्यास मदत करू शकतो. याचा एक छोटा तुकडा चीनच्या पर्पल माउंटेन ऑब्जर्वेटरीमध्ये अध्ययनासाठी ठेवण्यात आला आहे. उल्कापिंड कलेक्टर्ससाठी अत्यंत मूल्यवान असतो. हा दगड स्वत:चे दुर्लभत्व आणि आकारामुळे जगभरात चर्चा मिळवत आहे.









