महिला-युवा सर्वाधिक प्रभावित
एकीकडे जगभरात हवामान बदलाच्या भयावहतेवर चर्चा सुरु आहेत, तर आता समाजाचे काही वर्ग विशेषकरून महिला, युवा, डाव्या विचारसरणीचे लोक आणि पर्यावरणाबद्दल संवेदनशील लोक या संकटावरून सर्वाधिक चिंतेत असल्याचे स्पष्ट होत आहे.
एका आंतरराष्ट्रीय मेटा-विश्लेषणात हवामान बदलावरून उत्पन्न मानसिक चिंता केवळ एक नवी मनोवैज्ञानिक स्थिती नसून ती भावनात्मक अस्थिरतेसोबत बदलाच्या प्रेरणेचा स्रोतही ठरू शकते असे समोर आले आहे. जर्मनीच्या लीपजिग युनिव्हर्सिटी आणि टीयू डॉर्टमंड युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांकडून करण्यात आलेल्या या मेटा-विश्लेषणात 94 प्रमुख अध्ययनांना सामील करण्यात आले, ज्यात 27 देशांचे 1,70,747 जण सहभागी होते. यातून हवामान चिंता, सामान्य चिंतेपेक्षा वेगळी एक अनोखी मानसिक सिथती असल्याचे स्पष्ट झाले. आता ही वैश्विक चेतना आणि धोरण निर्मितीचा एक अनिवार्य हिस्सा होत आहे.
हवामान बदलावरून गंभीर स्वरुपात चिंतेत लोकांमध्ये प्रामुख्याने महिला, युवा आणि पर्यावरणाबद्दल संवेदनशील असलेले लोक सामील असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले. हे अध्ययन ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंजमध्ये प्रकाशित झाले आहे. बहुतांश अध्ययनं विकसित देशांमध्ये केंद्रीत होती, तर हवामान बदलाचे सर्वाधिक प्रभाव विकसनशील देश म्हणजेच ग्लोबल साउथमध्ये दिसून येतो. अशा स्थितीत वैज्ञानिकांनी विशेष स्वरुपात या देशांमध्ये हवामान चिंतेवर अधिक संशोधनाची आवश्यकता व्यक्त केली आहे.
राजकीय, सामाजिक नेतृत्वाची जबाबदारी
हवामान चिंतेला दुर्लक्षित करणे धोकादायक ठरेल. हे आम्हाला केवळ भीती दाखवत नाही, तर बदल करण्यासाठी हीच वेळ असल्याचे सचेत करते. जनमानसात निर्माण होणाऱ्या या चिंतेला समजून धोरणात बदल करून ते सकारात्मक दिशेने न्यावी. याचबरोबर युवा आणि पर्यावरणील संकटाचा वारंवार सामना करणाऱ्या समुदायांना मानसिक आणि भावनात्मक सहकार्य करावे असे आवाहन अध्ययनात सामील वैज्ञानिक हेंस जॅचर यांनी राजकीय अन् सामाजिक नेतृत्वाला केले आहे.









