पूर्वीच्याच गावांचा नवीन प्रारूप प्रभाग रचनेत समाविष्ट राहिला आहे.
शाहूवाडी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील दोन जिल्हा परिषद मतदार संघांच्या नावात बदल झाला आहे. तर चार पंचायत समिती मतदारसंघांची नावे बदलली आहेत. मात्र पूर्वीच्याच गावांचा नवीन प्रारूप प्रभाग रचनेत समाविष्ट राहिला आहे.
केवळ मतदारसंघांची नावे बदलली आहेत. शाहूवाडी तालुक्यात चार जि. प. मतदारसंघ, आठ पंचायत समिती मतदारसंघ होते. पूर्वी तालुक्यात शितूर वारूण, सरूड, पिशवी, पणुंद्रे असे जि. प. मतदारसंघ होते. तर पंचायत समितीसाठी शित्तूर वारूण, कडवे, भेडसगाव, सरूड, पिशवी, बांबवडे, पणुंद्रे, करंजफेण असे पंचायत समिती गट होते.
पाचही मतदारसंघ का जिल्हा परिषद मतदारसंघ पूर्वी पिशवी जिल्हा परिषद मतदारसंघ अंतर्गत पिशवी पं. स. आणि बांबवडे पं. स. अशी गट रचना होती. मात्र नव्या प्रभाग प्रारूप रचनेत बांबवडे मतदारसंघ असा बदल झाला आहे. तर पिशवी मतदारसंघाचा साळशी पं. स. असा बदल झाला आहे.
यामुळे यापुढे आता पिशवी ऐवजी बांबवडे जि. प. आणि पं. स. आणि साळशी पं. स. असा नवीन बदल झाला आहे. सरुड आहे तीच स्थिती तालुक्यातील एकमेव सरूड जि. प. मतदारसंघात कोणताही बद्दल झाला नाही. पूर्वीच्या सरूड जि. प. मतदारसंघ अंतर्गत सरूड पं. स. आणि भेडसगाव पं. स. ही पूर्वीचीच गण आणि गटाची नावे कायम राहिली आहेत. यामुळे या मतदारसंघात कोणताही बदल झालेला नाही.
आता लक्ष आरक्षणाकडे
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली. आता इच्छुकांबरोबरच प्रमुख नेते मंडळींचे आरक्षण काय पडणार याकडे लक्ष लागले आहे. याची कुजबूज आतापासूनच मतदारसंघात सुरू झाली आहे. त्यामुळे बदललेल्या नव्या नावाच्या मतदारसंघात नवीन चेहरे दिसणार की जुन्या चेहऱ्यांनाच नव्या मतदारसंघात नशीब आजमावे लागणार याचीसुद्धा उत्सुकता लागून राहिली आहे.
भादोले जिल्हा परिषद मतदारसंघाची नावे पूर्वीच्या शित्तूर वारूण जि. प. मतदारसंघातील कडवे पं. स. मतदारसंघ असे नाव होते. मात्र आता कडवे पं. स. ऐवजी येलूर पं. स. असा मतदारसंघ केला आहे.पूर्वीच्याच मतदार संघातील गावांचा या नवीन नावाच्या मतदारसंघात समावेश कायम आहे.
पूर्वी पणुंद्रे जि. प. नावाने असलेल्या मतदार संघाचे नाव आंबर्डे असे झाले आहे. याच मतदारसंघातील करंजफेण पं. स. मतदारसंघाऐवजी येळवण जुगाई पं. स. मतदारसंघ तयार झाला आहे. या मतदारसंघातील जि. प आणि पं. स. दोन्ही मतदारसंघाच्या नावात बदल झाला. त्यामुळे यापुढे आंबर्डे आणि त्या अंतर्गत आंबर्डे आणि येळवण जुगाई पंचायत समिती अशी नवीन नावे आली आहेत.








