शिरोळ येथे नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर शिरोळ मतदारसंघ रद्द झाला
कुरुंदवाड: शिरोळ तालुक्यात पूर्वी दानोळी, उदगाव, आलास, शिरोळ, नांदणी, अब्दुललाट आणि दत्तवाड असे एकूण 7 जिल्हा परिषद मतदारसंघ होते. 2018 मध्ये शिरोळ येथे नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर शिरोळ मतदारसंघ रद्द झाला. त्यावेळी अकिवाट हा गण कायम राहिला. त्यानंतर यड्राव हा नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला.
या बदलामुळे मतदारसंघांची संख्या पूर्वीप्रमाणे सातच राहिली असली तरी त्यातील गावांची मोठ्या प्रमाणावर फेरफार झाली आहे. विशेषत: अब्दुललाट, नांदणी, उदगाव आणि दत्तवाड या गटांमधील गावांचे पुनर्विभाजन केले आहे. याआधी शिरोळ तालुक्यात 7 गट आणि 14 गण होते.
दोन वर्षांपूर्वीच्या प्रस्तावित पुनर्रचनेत अकिवाट आणि यड्राव हे दोन नवीन गट तयार केले होते. त्यावर आरक्षणही जाहीर झाले होते. मात्र ही रचना आणि आरक्षण पुढे रद्द झाले.
महत्वाचे बदल
दानोळी गण : दानोळी, कवठेसार,
तमदलगे, कोथळी गण : कोथळी, उमळवाड, निमशिरगाव, जैनापूर,
उदगाव गट : उदगाव गण : उदगाव, मौजे आगर.
अर्जुनवाड गण : अर्जुनवाड, चिंचवाड, घालवाड, कनवाड, कुटवाड, हसूर
आलास गट : आलास गण : आलास, औरवाड, नृसिंहवाडी, बुबनाळ, गौरवाड
गणेशवाडी गण : गणेशवाडी, शिरटी, शेडशाळ
नांदणी गट : नांदणी गण : नांदणी, जांभळी,
हरोली. चिपरी गण : चिपरी, धरणगुत्ती, संभाजीपूर, भैरवाडी (कुरुंदवाड ग्रामीण)
यड्राव गट : यड्राव गण : यड्राव, टाकवडे, कोंडिग्रे.
शिरढोण गण : शिरढोण, शिरदवाड, शिवनाकवाडी
अब्दुललाट गट : अब्दुललाट गण : अब्दुललाट,
टाकळीवाडी, हेरवाड. अकिवाट गण : अकिवाट, तेरवाड, मजरेवाडी, बस्तवाड
दत्तवाड गट : दत्तवाड गण : दत्तवाड, घोसरवाड, टाकळीवाडी.
सैनिक टाकळी गण : सै. टाकळी, जुने दानवाड, नवे दानवाड, राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी यड्राव येथे नव्याने जि. प. गट स्थापन
- चिपरी येथे नव्याने पं. स. गण
- अकिवाट गट नव्याने अस्तित्वात नाही
- उदगाव गणात दोनच गावांचा समावेश
- या गावांचे झाले पुनर्वसन
शिरदवाड, टाकवडे, शिवनाकवाडी, शिरढोण यड्रावमध्ये समाविष्ट.








