सोनाली गावडे मृत्यू प्रकरण
प्रतिनिधी
बांदा
इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे ( वय. २५) संशयास्पद मृत्यूप्रकरणाची धास्ती सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतली आहे. प्रथमता पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट बोलणारे पोलीस आता तिचा मृत्यू संशयास्पद असेल या दृष्टीने तपास सुरु केला आहे. आज स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथक इन्सुली परिसरात ठाण मांडून होते. तर बांदा पोलिसांचे पथक घटनास्थळा पासून आसपास असलेल्या सिसिटीव्ही फुटेजची तपासणी करत होते. त्यामुळे आता या प्रकरणाचा लवकरच छडा लागेल अशी आशा ग्रामस्थांतुन व्यक्त होत आहे. इन्सुली कोठावळेबांध सोनाली प्रभाकर गावडे ही युवती मंगळवारी कामासाठी निघालेली ही युवती घरी न परतल्याने तिची सर्वत्र शोधाशोध केल्यावर न मिळाल्याने ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तर बुधवारी सकाळी पहाटे तिचा मृतदेह दोन फुट पाण्यात आढळून आला. दरम्यान वैद्यकीय अहवालात तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे म्हटले. मात्र ज्या ठिकाणी तिचा मृतदेह आढळून आला त्या ठिकाणी दोन फुटच पाणी असल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू कसा होईल त्यामुळे घातपात असण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे या घटनेबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली होती. तब्बल सात दिवस उलटत आले तरी हवा तसा तपास करण्यास पोलिसांना अपयश आले. सोमवारी सकाळी सिंधुदुर्ग पोलीस स्थानिक गुन्हा अन्वेषण चे पथक बांदा येथे दाखल झाले होते. बांदा पोलिसांकडून प्राथमिक माहिती घेऊन दुपारी बाराच्या दरम्यान इन्सुली कोठावळेबांध येथे तपास कामासाठी दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी घटनास्थळी जात तीचा मृतदेह जेथे सापडला त्या परिसराची पाहणी केली. यावेळी स्थानिकाकडून माहिती घेण्यात आली. दरम्यान त्या ठिकाणी असणारे पाणी बघून या ठिकाणी बुडून तिचा मृत्यू होणे कठीण असल्याचे त्यातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तर तिची छत्री व मोबाईल ज्या ठिकाणी सापडली त्यात व मृतदेह मध्ये असणारे अंतर यामध्ये सुद्धा त्यांना संशय निर्माण झाला. तब्बल अर्धा तास हुन अधिक वेळ सदर पथक घटनास्थळी काही सुगावा मिळतो की नाही याची पाहणी करत होते. दरम्यान त्याना काही सुगावा लागला की नाही याबाबत काही माहिती मिळाली नाही. घटनास्थळावरून सदर पथक मयत सोनाली गावडे यांच्या घरी गेले. तेथे उपस्थित तिचे वडील, काकी, बहीण, यांचा जबाब यावेळी पोलिसांनी घेतला. दरम्यान घरातील प्रत्येकाला वेगवेगळे घेऊन त्यांच्याकडून माहिती घेण्याचे काम स्थानिक गुन्हा अन्वेषण पाथकाकडून करण्यात आले. तसेच मयत सोनालीच्या कागदपत्राची सुद्धा त्यांनी पाहणी केली. दरम्यान तिला कोणी कोणी कॉल केला होता याची सुद्धा डिटेल ते घेणार आहेत. तर घरातील सर्व सदस्यांचे नंबर घेतले असुन त्यांची सुद्धा डिटेल काढणार असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी दिली. सायंकाळी स्थानिक गुन्हा अन्वेषण चे पथक काम करून निघुन गेले.तर बांदा सहा पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे सायंकाळी इन्सुलित ठाण मांडून होते. सिसिटीव्ही मध्ये आढळून आलेला तो युवक कोण याबाबत आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलीस करीत होते. दरम्यान त्या वेळात आलेला तो युवक कोण हे स्पष्ट झाल्यावर गूढ उकलणार आहे.









