प्रतिनिधी/बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने सावगाव येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
युवा आघाडी सावगावचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, एसडीएमसी अध्यक्ष सागर सांगावकर तसेच राजू कदम, दर्शन घाटेगस्ती, गजानन घाटेगस्ती, केदारी घुग्रेटकर, उत्तम कदम यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले. यावेळी मराठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आर. डी. पाटील यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते.









