डॉ. फडणीस यांनी दृकश्राव्य माध्यमातून मांडले विचार
- प्रतिनिधी/ बेळगाव
बुक लव्हर्स क्लबच्या बैठकीमध्ये डॉ. प्रकाश फडणीस यांनी ‘शेवटचा दिस गोड व्हावा’ या अनिल जोशी यांच्या पुस्तकावर आधारित ‘लागले नेत्र हे पैलतीरी’ हा कार्यक्रम सादर केला.
ते म्हणाले, आजच्या परिस्थितीत निव्वळ आयुष्य वाढविण्याची खटपट सुरू असताना रुग्णासह इतरांची ससेहोलपट विचारात घेण्याची गरज आहे. आयुष्य जगण्याचा तसेच ऐच्छिक मृत्यूचा अधिकार घटनेने दिला आहे. यासाठीच ‘लिव्हींग वीलची’ तरतूद असावी, असा विचार चर्चेत आहे. इच्छामरण आदी अनेक मुद्द्यांवर डॉ. फडणीस यांनी दृकश्राव्य माध्यमातून विचार मांडले. प्रारंभी उपाध्यक्ष किशोर काकडे यांनी स्वागत केले.









