बेळगाव : महापालिका प्रशासनाने सुशासन व पादर्शकता यावर भर देऊन ई-आस्थी व बी-खाता मिळविण्यासाठी नागरिकांना अनुकूल व्हावे, अशी व्यवस्था करावी. सध्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि विसंगत बनत चालली आहे. यामुळे मालमत्ता मालकांना नाहक त्रासाला सामारे जावे लागत आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने ई-आस्थी व बी-खाताची जटिल असलेली प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी आपच्यावतीने करण्यात आली. याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. वैध सीटीएस क्रमांक व कर भरलेले बिल असलेल्या नागरिकांवर अधिक कागदपत्रांचा भार टाकू नये. फॉर्म 2 द्वारे आधारित मालमत्तांना ई-आस्थी देण्यात विलंब करू नये. बेळगावमधील ई-आस्थीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे बीबीएमपी बेंगळूरशी जुळली पाहिजेत. बांधकाम परवानगी, लेआऊट प्लॅन आणि पूर्णत्त्व कागदपत्रे यासारखी कालबाहृ कागदपत्रे विशेषत: जुन्या मालमत्तांसाठी मागू नयेत.
मृत्युपत्र स्वीकारावो-ई-आस्थी अर्जासाठी मुदत नसावी
बक्षीसपत्र, नोंदणीकृत मृत्यूपत्र आदी कायदेशीर कागदपत्रे स्वीकारावीत. बी-खातासाठी प्रामाणिक प्रक्रिया विकसित करावी, ई-आस्थी अर्जासाठी मुदत नसावी, अर्ज नाकारल्यास याची कारणे संबंधितांना कळवावीत. गोंधळ दूर करण्यासाठी सार्वजनिक सूचना जारी करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी विजय पाटील, पवन कुमार, सुधीन नेसरकर, जुनेद बाशा, सोमिया डिसोजा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









