सक्षम चषक फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : सक्षम स्पोर्ट्स एरियाना आयोजित 17 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत उद्घाटन दिवशी एनपीडी, केएलएस, सेंट झेवियर्स व कॅन्टोन्मेंट संघानी आपल्या प्रतीस्पर्ध्यांवर मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मंडोळी रोड येथील सक्षम स्पोर्ट्स एरियाना मैदानावरती या आंतरशोलय फुटबॉल स्पर्धेत पहिल्या सामन्यात एनपीईटी संघाने बिर्ला संघाचा 4-1 असा पराभव केला. या समान्यात 11 व्या मि. ला एनपीटीच्या रब्बानीने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 18 व्या मि. ला बिर्लाच्या ओमकारने गोल करून 1-1 अशी बरोबरी साधली. 22,27,34 व्या मि. ला एनपीईटीच्या मावीयाने सलग तीन गोल करीत 4-1 अशी आघाडी मिळवून दिली. मावीयाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
दुसऱ्या सामन्यात एमव्हीएमने ज्योती संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव केला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पंचानी टायब्रेकर नियमाचा वापर केला. यामध्ये एमव्हीएमने 3-2 असा फरकाने पराभव केला. एमव्हीएमने प्रणव, अंकीत व आशिष यांनी गोल केले. ज्योतीतर्फे किरण व संकेतने गोल केला. प्रणवला सामानावीर पुरस्कार देण्यात आला. तिसऱ्या सामन्यात कॅन्टोन्मेंट संघाने अंजुमनचा 3-1 असा पराभव केला. 7 व्या मि. ला कॅन्टोन्मेंटच्या आयान चोपदारच्या पासवर अफताब शेखने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 12 व्या मि. ला. अफताबच्या पासवर अयान चोपदारने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 22 व्या मि. ला अंजुमनच्या ओवेसने गोल करून 1-2 अशी आघाडी कमी केली. 27 व्या मि. आयानच्या पासवर सुरेश रूपडीने गोल करून 3-1 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. अफताबला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
चौथ्या सामन्यात एनपीटी संघाने एमव्हीएम अ चा 1-0 असा निसटता पराभव केला. सामन्याच्या 17 व्या मि. ला. एनपीटीच्या माविच्या पासवर उजेरने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात एमव्हीएमला गोल करण्यात अपयश आले. उजेरला सामनावीर पुरस्कार देण्यात आले. पाचव्या सामन्यात केएलएसने प्लेझन्ट कॉन्व्हेंट संघाचा 6-0 असा पराभव केला. या सामन्यात 9 व्या मि. ला अनिकेत पाटीलच्या पासवर प्रणवने पहिला गोल केला. 11 व्या मि.ला. साईनाथच्या पासवर अनिकेतने दुसरा गोल केला. तर 16 व्या मि.ला. प्रणवच्या पासवर अनिकेतने तिसरा गोल करून 3-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 22 व्या. मि. ला. साईनाथच्या पासवर प्रणवने चौथा गोल केला. 25 व्या मि.ला. अनिकेतच्या पासवर साईनाथने 5 तर 29 व्या. मि.ला. साईनाथच्या पासवर प्रणवने 6 गोल करून 6-0 ची आघाडी मिळवून दिली. अनिकेत पाटीलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सहावा सामना कॅन्टोन्मेंट संघाने एमव्हीएम ब चा 4-0 असा पराभव केला. या सामन्यात 7 व्या मि.ला कॅन्टोन्मेंटच्या अफताबच्या पासवर अर्थवने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 13 व्या मि.ला. अर्थवच्या पासवर आयान चोपदारने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 23 व्या मि. ला. आयानच्या पासवर अर्थव चौगुलेने तिसरा गोल केला तर 29 व्या मि.ला. अर्थवच्या पासवर अफताबने शेखने गोल करून 4-0 अशी महत्वाची आघाडी मिळवून दिली. अर्थव चौगुलेला सामनावीर पुरस्कार दिला. सातव्या सामन्यात सेंट झेवियर्सने हेरवाडकर संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव केला. या सामन्यात 10 व्या मि. ला. हेरवाडकरच्या अर्थवने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 18 व्या मि. ला. झेवियर्सच्या आयुष्य सिद्धण्णावरने गोल करून 1-1 अशी बरोबरी साधली.
निर्धारीतवेळेत दोन्ही संघाचे गोलफलक समान असल्याने पंचानी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये झेवियर्सने 4-3 असा पराभव केला. झेवियर्सतर्फे माविया भडकली, सैफ माडिवाळ, बेर रोईवाले यांनी गोल केले. तर हेरवाडकरतर्फे आयुष व अनिकेत यांनी गोल केला. माहिद भडकलीला सामनावीर पुरस्कार देण्यात आले. आठव्या सामन्यात केएलएसने डिवायन मर्सी संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 9 व्या मि.ला. प्रणवच्या पासवर दक्षने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 19 व्या मि.ला. दक्षच्या पासवर अनिकेतने गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळून दिली. 24 व्या मि.ला. अनिकेतच्या पासवर प्रणव लाडने तिसरा गोल करून 3-0 ची महत्वाची आघाडी मिळून दिली. प्रणव लाडला सामानवीर पुरस्कार देण्यात आले.









