वृत्तसंस्था/ लोनाटो (इटली)
आयएसएसएफ विश्व चषक शॉटगन नेमबाजी स्पर्धेत भावतेजसिंग गिलने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. भारताच्या मिराज अहमद खान तसेच महिलांच्या विभागात गनेमत सेखाँने स्कीट नेमबाजीत अंतिमफेरी गाठली आहे.
पुरूषांच्या शॉटगन स्कीट नेमबाजीच्या पात्रफेरीमध्ये गिल आणि मिराज अहमद खान यांनी समान 98 शॉटस् नोंदविल्याने ते दोघेही अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. महिलांच्या विभागात गनेमतने 96 शॉटस् नोंदवित अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. भारताचे ऑलिंम्पिक नेमबाज माहेश्वरी चौहान आणि रेझा धिलाँग यांना मात्र 27 व्या आणि 28 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिलांच्या या प्रकारात अमेरिकेची डेनिया व्हिझी 98 शॉटस्सह आघाडीवर आहे.









