बेळगाव : मुसळधार पावसामुळे शहरातील डांबरी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. आंबेडकर चौक, खासबाग येथील रस्त्यावर देखील मोठमोठे खड्डे पडले आहेत. सदर खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी भरल्यास खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने शाळकरी मुले पडण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे नगरसेवक रवी साळुंखे यांनी महापालिकेला ही माहिती देऊन सोमवारी सदर खड्ड्यांमध्ये खडी टाकण्यास सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आंबेडकर चौक, खासबाग येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले तरीदेखील त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले होते. सदर खड्ड्यांमध्ये शाळकरी मुले पडल्याची माहिती समजताच नगरसेवक रवी साळुंखे यांनी ही माहिती महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांना सांगितली. त्यानंतर सोमवारी तातडीने खड्ड्यात खडीचा भराव घालून ते बुजविण्यात आले. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
Previous Articleबस बंद पडल्याने रहदारीस अडथळा
Next Article चिपळुणात गोळीबारप्रकरणी दोघांना अटक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









