इटर्नलने केली नेमणूक : 2 वर्षाची जबाबदारी
वृत्तसंस्था/ बेंगळूर
ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी इटर्नल म्हणजेच झोमॅटोने आदित्य मंगला यांची फूड ऑफरिंग व डिलिव्हरी व्यवसायाच्या सीईओपदी नियुक्ती जाहीर केली आहे. कंपनीने ही माहिती शेअर बाजाराला दिली आहे.
आदित्य मंगला हे सीईओसोबत वरिष्ठ व्यवस्थापकीय प्रोफेशनल म्हणूनही काम पाहतील. 6 जुलैला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये त्यांच्या निवडीला मान्यता मिळाली आहे. राकेश रंजन यांची ते जागा आता घेतील. राकेश रंजन यांनी यापूर्वी सीईओपदाची यशस्वीपणे दोन वर्षे पूर्ण केली आहेत. आदित्य हे सध्याला फूड ऑर्डरिंग व डिलिव्हरी प्रॉडक्ट हेड आहेत. 2021 मध्ये इटर्नलमध्ये सामील झाल्यानंतर खाद्य व्यवसायात महत्त्वाचे योगदान त्यांनी दिले आहे. हेड ऑफ सप्लाय व हेड ऑफ कस्टमर एक्सपिरीयन्स ही पदेही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहेत. रेस्टॉरंट भागीदार यांच्यातील प्रणाली मजबूत करताना डिजिटल प्लॅटफॉर्मवर ग्राहक समाधान वाढवण्याचे काम त्यांनी केले आहे. इटर्नलमध्ये येण्यापूर्वी आदित्य मंगला यांनी अनेक स्टार्टअप व टेक आधारित कंपन्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केले होते.









