फुलेवाडी :
फुलेवाडी फुलेवाडी परिसरातील बोंद्रे नगर मधील भोगम पार्क, पाडळी रोडवरील रस्त्यालगत कचऱ्याचा ढीग साचला आहे. भोगम पार्क मधील धनगर वाडा वसाहत संपल्याबरोबर रस्त्यालगत कचऱ्याचा ढीग साचला आहे. हा कचरा पावसाने भिजल्यामुळे त्याला दुर्गंधी आलेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने घंटागाडीची मागणी केली आहे. येथून काही अंतरावर के एमटी कॉ लनी आहे. कचऱ्याचा ढीग साचला आहे. या कचऱ्यामुळे भूमी नंदन कॉलनी गणेश पार्क, निसर्ग पार्क या कॉ लनीतील लोकांना त्रास होत आहे. या तिन्ही कॉलनी पाडळी ग्रामपंचायत अंतर्गत येतात. तेव्हा पाडळी खुर्द ग्रामपंचायतने कचरा गाडी ची व्यवस्था करून याची विल्हेवाट लावावी. तेव्हा भोगम पार्क व केएमटी कॉलनी येथील कचयाची व्यवस्था लवकरात लवकर महानगरपालिका व पाडळी ग्रामपंचायतीने करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्यास महानगरपालिका व ग्रामपंचायत पाडळी खुर्द यांनी या समस्यावर उपाय करण्याची मागणी होत आहे.








