फॅबलिग 7 ए साईड फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित अमोधराज स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत दुसऱ्या फॅबलिक 7 ए साईड फुटबॉल स्पर्धेत केआर शेट्टी किंग्स, सिग्निचर स्पोर्ट्स, टेनटेन एफसी संघाने आपल्या प्रतिस्पर्धांवर मात करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. तर रॉ फिटनेसला टेनटेन एफसीने, साईराजला राहुल के.आर. शेट्टीने, ओल्ड फाटजला रॉ फिटनेसने बरोबरीत रोखले. वडगाव येथील 7 सीआर स्पोर्ट्स एरियानाच्या टर्फ मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात के. आर. शेट्टी किंग्स संघाने डिसायडर एफसीचा 1-0 असा निसटता पराभव केला.
या सामन्यात 12 व्या मिनिटाला किरण निकमने एकमेव गोल केला. दुसऱ्या सामन्यात रॉ फिटनेस एफसीला टेनटेन एफसीने 1-1 अशा बरोबरीत रोखले. या सामन्यात 7 व्या मि. रॉ फीटनेसच्या सुफीयान सय्यदने गोल केला. तर 15 व्या मिनिंला. टेनटेन एफसीच्या निखिल नेसरीकरने गोल केला. तिसऱ्या सामन्यात साईराज वॉरियर्सला राहुल के. आर. शेट्टी संघाने शुन्य बरोबरीत रोखले. या सामन्यात दोन्ही संघानी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. चौथ्या सामन्यात सिग्नीचर स्पोर्ट्स क्लबने ग्रो स्पोर्ट्स एफसीचा 1-0 असा निसटता पराभव केला.
या सामन्यात सिग्नीचरच्या अल्तमश जमादारने 13 व्या मिनीटाला गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. ग्रो स्पोर्ट्सच्या खेळाडूनी अनेक गोल करण्याच्या संधी दवडल्याने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. पाचव्या सामन्यात ओल्ड फाटा संघाला रॉ फिटनेस संघाने 2-2 अशा बरोबरीत रोखले. या सामन्यात तिसऱ्या मिनीटला ओल्ड फाटाच्या शशांक बोळगुंडीच्या पासवर कौशीक पाटीलने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. पाचव्या मिनिटाला रॉ फिटनेसच्या प्रज्वल लाडने बचाव फळीला चकवत गोल करून 1-1 अशी बरोबरी केली.
दुसऱ्या सत्रात 21 व्या मिनीटाला ओल्ड फाटाच्या कौशीक पाटीलच्या पासवर शशांक बोळगुंडेने दुसरा गोल करून 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. खेळ संपण्यास 1 मिनीट बाकी असताना रॉ फिटनेसच्या प्रज्वलने दुसरा गोल करून 2-2 अशी बरोबरी साधली. सहाव्या सामन्यात टेनटेन एफसीने भारत एफसीचा 1-0 असा निसटता पराभव केला. सामन्याच्या 15 व्या मिनिटाला टेनटेन एफसीच्या निखिल नेसरीकरच्या पासवर ओंमरूप चंदानेने गोल करून 1-0 ची महत्वाची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारत एफसीने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले.









