न्यूयॉर्क :
अमेरिकेच्या इडाहोमध्ये आग विझविण्यासाठी गेलेल्या अग्निशमन कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला आहे. या घटनेत अग्निशमन दलाच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर हल्लेखोर इडाहोच्या जंगलात लपले असून ते सातत्याने गोळीबार करत आहेत. हल्लेखोर अन् पोलीस यांच्यात चकमक सुरू आहे.
इडाहोच्या कूर्टेने काउंटीच्या कनफॅलड माउंटेनवरील जंगलात आग लागली होती. अग्निशमन कर्मचारी आग विझविण्यासाठी पोहोचले असता त्यांच्यावर बेछूट गोळीबार सुरू झाला. या घटनेत आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस अन् हल्लेखोरांदरम्यान चकमक सुरू असल्याने तेथे वास्तव्य करणारे लोक सुरक्षितस्थळी धाव घेत असल्याचे इडाहोचे लोकल शेरिफ रॉबर्ट नॉरिस यांनी सांगितले.









