बेळगाव : गांजाची वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला सीसीबी पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी रात्री कंग्राळी बुद्रुक मुख्य रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली असून मनोहर ऊर्फ बाळू गजानन हुद्दार (रा. कलमेश्वरनगर, कंग्राळी बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 88 हजार 700 रुपये किमतीचा 3.468 किलो गांजा, 3 हजार 700 रुपयांची रोकड, एक मोबाईल असा एकूण 94 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंग्राळी बुद्रुक येथून शाहूनगरकडे गांजाची वाहतूक केली जात आहे, अशी माहिती सीसीबी पोलीस स्थानकाचे निरीक्षक नंदीश्वर कुंभार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून कंग्राळी मुख्य रस्त्यावर कार थांबवून झडती घेतली असता त्याच्याकडे 88 हजार 700 रु. किमतीचा 3.468 किलो गांजा, 3700 रुपयांची रोकड व एक मोबाईल आढळून आला. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन एपीएमसी पोलीस स्थानकात नेले. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाईत सीसीबीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, आय. एस. पाटील, एस. बी. पाटील, ए. एन. रामनगट्टी, जगदीश हादीमनी, अमरनाथ दंडीन, सचिन शिंदे, एम. एस. पाटील, एस. मुगुळखोड आदींनी सहभाग घेतला.









