वृत्तसंस्था / लोवा (अमेरिका)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या सुपर 300 दर्जाच्या अमेरिकन खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा आणि आयुष शेट्टी यांनी एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
महिला एकेरीच्या मिळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या 16 वर्षीय तन्वी शर्माने मलेशियाच्या के. लिशेनाचा केवळ 33 मिनिटांमध्ये 21-13, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले.
पुरुष एकेरीच्या अपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आयुष शेट्टीने चीन तैपेईचा कनिष्ठ गटातील विश्व चॅम्पियन कुआनचा 22-20, 21-9 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली. मात्र भारताच्या ए. हरिहरण आणि आर. रुबेनकुमार यांचे पुरुष दुहेरीतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीयचा सामन्यात चीन तैपेईच्या चेंग आणि वेई यांनी 21-9, 21-19 असे संपुष्टात आणले. आता महिला एकेरीत तन्वी शर्माची उपांत्य लढत युक्रेनच्या बुरोव्हाशी होणार आहे. तर आयुष शेट्टीचा उपांत्य फेरीचा सामना चीन तैपेईया टॉप सिडेड चेनशी होणार आहे.









