सातारा :
स्वारगेटहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये शुक्रवारी बेवारस पार्सल बॉक्स आढळल्याने एकच खळबळ उडाली. आनेवाडी टोलनाक्यावर एसटीबस थांबल्यावर तिकिट तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना हा बॉक्स दिसला. त्यानंतर याबाबत तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एसटी बस पोलीस ठाण्याच्या परिसरात आणून बॉक्सची तपासणी केली.
प्रवाशांनी भरलेली पुणे स्वारगेट कोल्हापूर बस आनेवाडी टोलनाका येथे आली. याच वेळी तिकीट चेक करणारे पथक एसटीबस मध्ये चढले. सर्वच प्रवाशांचे तिकीट चेक करण्याचे काम सुरू होते. यावेळी एसटी बसमध्ये मागच्या सीटवर एक बॉक्स पथकातील सदस्याला दिसला. प्लास्टिकच्या कागदात पॅक केलेला हा बॉक्स बघून त्याला संशय आला. त्याने हा बॉक्स कुणाचा आहे. अशी विचाराणा केली. यामुळे सर्वच प्रवाशी त्या बॉक्सकडे बघु लागले. सगळे प्रवासी आमचे नाही म्हंटल्यावर चालक, वाहक व पथक चर्चा करू लागले. यामुळे प्रवाशांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत तात्काळ सातारा तालुका पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत एसटी बसमधून सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून एसटीबस थेट सातारा तालुका पोलीस ठाण्यात आणली. एसटी बस आणताच श्वान पथकाला बोलवण्यात आले. श्वान पथकाने बॉक्सची पाहणी केली. यावेळी बॉ म्बसारखी कोणतीही वस्तू नसल्याचे निश्चित झाले. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी हा बॉक्स उघडला. त्यावेळी बॉक्समध्ये कंपनीचे साहित्य होते. यामध्ये वायर तसेच इतर वस्तू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हा बॉक्स ताब्यात घेतला. त्यानंतर एसटी बस पुन्हा डेपोत पाठवण्यात आली. ज्या कंपनीचा हा बॉक्स आहे. त्या कंपनीत पोलिसांनी संपर्क साधला. यावेळी कंपनीचा जो प्रवासी प्रवास करत होता. तो बॉक्स विसरून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
- आरडीएक्स मुळे पोलीस झाले अर्लट
काही दिवसापुर्वी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा है आरडीएक्स ने उडवून देण्याचा मेल मुंबईला आला होता. हा खोटा मेल होता. परंतु या मेल मुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. पोलिसानी कार्यालयातील कानाकोपरा तपासला. श्वान पथकाही आले होते. परंतु कार्यालयात आरडीएक्स नसल्याने मोठा धोका टळला. या घटनेपासून जिल्ह्यातील पोलीस अर्लट झाले आहेत. प्रत्येक घटनेवर पोलीस करडी नरज ठेऊन आहेत.








