वृत्तसंस्था / लोवा (अमेरिका)
2025 च्या बॅडमिंटन हंगामातील येथे सुरू असलेल्या विश्वबॅडमिंटन फेडरेशनच्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि तन्वी शर्मा यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
पुरुष एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या सामन्यात चौथ्या मानांकीत आयुष शेट्टीने भारताच्या टी. मनिपल्लीचा 21-12, 13-21, 21-15 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. आता आयुष शेट्टीचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना चीन तैपेईच्या कुआन कुओशी होणार आहे.
महिला एकेरीच्या सामन्यात भारताच्या तन्वी शर्माने थायलंडच्या ओ. पिचामोनचा 21-18, 21-16 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत जवळच्या 8 खेळाडूंत स्थान मिळविले. तन्वी शर्माने 2023 साली कनिष्ट गटातील विश्वविजेतेपद मिळविले होते. आता तिचा पुढील सामना मलेशियाच्या के. लेशेनाशी होणार आहे. भारताच्या आकर्षी कश्यपचे आव्हान दुसऱ्याच फेरीत समाप्त झाले. मलेशियाच्या लेशेनानी कश्यपचा 21-17, 20-22, 21-13 असा पराभव केला. भारताच्या अनमोल खर्बचे आव्हान दुसऱ्या फेरीतच डेन्मार्कच्या लिनेकडून 21-23, 10-21 असे संपुष्टात आले. महिला दुहेरीत भारताच्या श्रुती मिश्रा आणि के. प्रिया यांचे आव्हान अमेरिकेच्या लॉरा लेम आणि ली यांनी 21-10, 21-14 असे संपुष्टात आणले.









