धरती जिओ चषक आंतर क्लब फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : धरती जिओ पुरस्कृत पॅब लिग 10 वर्षाखालील आंतर क्लब फुटबॉल स्पर्धेत उद्घाटन दिवशी बिटा संघाने डीयुएफसी, एमएसडीएफ ने मॅजिक ब चा, मॅजिक ब ने डीयुएफसी ब चा, एमएसडीएफने डीयुएफसीचा तर मॅजिक डीयुएफसी ब चा पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळवले. वडगावातील सीआर सेव्हन स्पोर्ट्स एरियानाच्या फुटबॉल मैदानावरती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धरती जिओचे सागर वाघमारे, नितीन काकडे, पंकज देसाई, निलेश साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते चषकाचे अनावरण केल्यानंतर उद्घाटन सामन्यातील संघांच्या खेळाडूंची ओळख करून घेतली आणि चेंडूला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पाच संघातून जवळपास 56 सामने साखळी खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघाला 14 सामने खेळण्यास मिळणार आहेत.
उद्घाटन सामन्यात मॅजिक ब ने डीयुएफसी संघाचा 4-0 असा पराभव केला. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला मॅजिक ब च्या इंद्रनीलच्या पासवर रियानने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. आठव्या मिनिटाला रियानच्या पासवर इंद्रनीलने दुसरा गोल केला. तर पंधराव्या मिनिटाला इंद्रनीलच्या पासवर शाश्वतने तिसरा गोल करून पहिल्या सत्रात 3-0 ची आघाडी मिळून दिली. 22 व्या मिनिटाला शाश्वतच्या पासवर रियानने चौथा गोल करून 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात एमएसडीएफ ए संघाने डीयुएफसीचा 5-0 असा पराभव केला. या सामन्यात तिसऱ्या व सातव्या मिनिटाला एमएसडीएफच्या सशांकच्या पासवर वरुणने सलग दोन गोल करून 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. चौदाव्या मिनिटाला वरुणच्या पासवर सशांकने गोल करून पहिल्या सत्रात 3-0 आघाडी मिळवून दिली. सतराव्या मिनिटाला वरुणच्या पासवर हम्मालने चौथा गोल केला. तर 19 व्या मिनिटाला वरुणने पाचवा गोल करून 5-0 आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या सामन्यात मॅजिक अ ने एमएसडीएफ ब चा 1-0 असा निसटता पराभव केला. सामन्याच्या तेराव्या मिनिटाला ताहीरच्या पासवर युसुफने गोल करून 1-0 आघाडी मिळून दिली. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्यांना अपयश आले. चौथ्या सामन्यात बिटा संघाने डीयुएफसी ब चा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात अकराव्या मिनिटाला बीटाच्या मुस्तवीच्या पासवर आरवने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळून दिली. दुसऱ्या सत्रात 22 व्या मिनिटाला अरवच्या पासवर मुस्तवीने दुसरा गोल करून 2-0 ची महत्वाची आघाडी मिळवून दिली. पाचव्या सामन्यात एमएसडीएफ अ संघाने मॅजिक ब चा 3-1 असा पराभव केला. या सामन्यात एमएसडीएफच्या वरुणने 3, 10 व 17 व्या मिनिटाला सलग तीन गोल करून स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक नोंदवली. 21 व्या मिनिटाला मॅजिक ब च्या शिवमने गोल करून 1-3 अशी आघाडी कमी केली.









